इंदापूर( युगारंभ)-
संसारा आलिया एक सुख आहे,आठवावे पाय विठोबाचे |
येणे होय सर्व संसार सुखाचा,नलगे दुःखाचा लेश काही ||
या संत तुकाराम महाराज यांच्या अंभगावर तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा युवा कीर्तनकार ह.भ.प. राहुल महाराज चोरमले यांच्या अमृतवाणीतून टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पार पडली.
रामजन्मोत्सवानिमित्त सराटी ता.इंदापूर आयोजित ज्ञानराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी ह.भ.प. राहूल महाराज चोरमले यांच्या किर्तन सेवेतून चैतन्य निर्माण झाला.तिसऱ्या दिवशीची प्रवचन सेवा प्रसाद कुलकर्णी शंकरनगर यांची झाली.
तसेच भारत उत्तम कोकाटे यांचा अल्पोपहार, चंद्रकांत त्र्यंबक कोकाटे यांचे दुपारचे जेवण तसेच विलास राजाराम कोकाटे यांनी सायंकाळची भोजन सेवा दिली.
या सप्ताहाच्या निमित्ताने सराटी ता.इंदापूर येथील सर्व ग्रामपंचायत, विविध संस्था, संघटना यांचे सहकार्य लाभत असल्याचे ह.भ.प. अभिजित महाराज कुरळे यांनी सांगितले