December 8, 2023
yugarambh
Breaking News
ठळक बातम्याराज्य

अकलूज येथे ह्रदयरोग व मधुमेह मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

अकलूज(युगारंभ ) – शिक्षण प्रसारक मंडळ व संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ, अकलूज यांचे वतीने शनिवार दि. ९/४/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता स्मृतीभवन येथे ह्रदयरोग व मधुमेह या आजारांवर सखोल माहिती, उपाययोजना व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले असल्याची माहीती मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी दिली.

धकाधकीच्या व तणावग्रस्त जीवन शैलीमुळे सध्या समाजामध्ये ह्रदयरोग आणि मधुमेह होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऐन तारुण्यात ह्रदयघातामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. तर खेळण्या बागडण्याच्या काळात लहान मुलांनाही मधुमेह होऊ लागला आहे. अतिरीक्त तणाव आणि चुकीची आहार पध्दती, व्यायामाचा अभाव असल्यामुळे या समस्यांना सतत सामोरे जावे लागत आहे. याबाबत समाजाला परिपपूर्ण माहिती मिळावी याकरीता डॉ. संभाजी राऊत (एमडी, कार्डीलॉजी) व डॉ. हर्षल एकतपुरे (एमडी, एंडोक्राइनोलॉजी, रुबी हॉस्पिटल, पुणे) हे मार्गदर्शन करणार आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.

सहकार महर्षि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे मार्गदर्शक श्री. जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित केले आहे.

संग्रामसिंह मोहिते पाटील मिञ मंडळ नेहमीच समाजोपयोगी विधायक कामांमध्ये अग्रेसर असते. भव्य आरोग्य शिबिरे, विविध खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धा, शेकडो कलाकारांची संख्या असलेले प्रचंड मोठे स्टेज शो, महिला, मुले व गरजुंसाठी विविध उपक्रम, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण व आरोग्य शिबिरे असे अनेक उपक्रम शिक्षण प्रसारक मंडळ व मित्र मंडळामार्फत नेहमीच राबवले जातात.

यावेळी जि.प. सदस्या कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Related posts

Prakash Ambedkar : देशात कोरोना मोदी घेऊन आले; प्रकाश आंबेडकरांचा आरोप 

Admin

जिजामाता कन्या प्रशालेत महिला दिन उत्साहात साजरा

yugarambh

वीज क्षेञ बचाव संयुक्त कृती समितीचा खाजगीकरणाविरोधात संप

yugarambh

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कला दिग्दर्शकाची आत्महत्या… कारण काय…..?

yugarambh

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचे प्रकरण;घटनापीठाच्या केसेसचं लाईव्ह प्रक्षेपण होणार… लिंक पहा

yugarambh

अकलूज कोविड सेंटरला लागलेल्या आगीत सुमारे ३ लाख १५ हजारांचे साहित्य जळून भस्मसात

yugarambh

Leave a Comment