राम म्हणता तरे जाणता नेणता |
हो का याती भलता कुळहीन ||
इंदापूर (युगारंभ )-श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सराटी ता.इंदापूर आयोजित ज्ञानराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह ती चौथ्या दिवशीच्या किर्तनमालेतील किर्तन ह.भ.प.श्रीराम महाराज अभंग यांचे झाले.प्रस्तुत अभंगातून श्रीराम महाराज अभंग यांनी राम नामाचा महिमा साध्या सोप्या शब्दांमध्ये वर्णन केला.
सायंकाळी प्रवचन प्रकाश शिंदे यांचे पार पडले.
चौथ्या दिवसाचा अल्पोपहार रोहिदास ज्ञानदेव कोकाटे, दुपारचे भोजन साहेबराव कोकाटे यांच्या स्मरणार्थ, सायंकाळची भोजन सेवा विनायक रामभाऊ साबळे यांची झाली.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करणार्या भाविकांना आयोजकांच्या वतीनेच तुकाराम गाथा भेट म्हणुन दिली जाणार आहे,तर श्री क्षेत्र पंढरपूर यात्रा मोफत केली जाणार असल्याचे ह.भ.प.अभिजित महाराज कुरळे यांनी सांगितले.