माळीनगर (युगारंभ )-माळीनगर आणि परिसरात अचानक लादण्यात आलेल्या लोडशेडिंगच्या विरोधात माळीनगर ग्रामस्थांनी केली महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा.
यावेळी माळीनगर ग्रामपंचायत सरपंच अभिमान जगताप सदस्य व कार्यकर्ते यांनी महावितरण कंपनीला जाब विचारला असून उन्हाळ्याचे दिवस असताना पाच -पाच सहा -सात तास लाईट बंद असल्याने वृद्ध बालक उन्हाने अस्वस्थ झाले असून,गावचा पाणीपुरवठा खंडित झाल्याने टाकी भरायला आठ तास लागतात.
तसेच माळीनगर हे मोठे गाव आणि लोकसंख्या असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने लोडशेडींग बंद करण्यात यावे अशी मागणी अभियंता ओबासे साहेब कार्यकारी अभियंता ‘ माळीनगर चे डिव्हिजन अधिकारी लोंढे यांच्याशी सकारात्मक चर्चा करून गावाची लोडशेडिंग बंद करण्या बाबत चर्चा झाली .
यावेळी सरपंच अभिमान जगताप उपसरपंच नागेश तुपसौंदर्य, विकास कांबळे, लक्ष्मण डोईफोडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते..