December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हाठळक बातम्या

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अकलूज येथील डॉ.राजीव राणे यांचा सत्कार

अकलूज (युगारंभ )-सोलापूर जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अकलूज येथील ॲपेक्स हॉस्पिटलचे चेअरमन व सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बालरोगतज्ञ असंख्य बालकांना जीवदान देणारे डॉ.राजीव कृष्णा राणे कविटकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ शितलदेवी राणे कविटकर यांना वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात केलेल्या अद्वितीय कार्याबद्दल विशाखा वेलफेअर सोशल फाउंडेशन नवी दिल्ली व नॅशनल युथ अवारडिज फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली आदी मान्यताप्राप्त संस्थांच्या वतीने दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे जागतिक महिला दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवार्ड २०२२प्रदान करण्यात आला.

 हा राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अंजना पवार आणि दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षा नॅन्सी बारलो भारत सरकारचे राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते व संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथील राज्यपाल नामित सिनेट सदस्य मनीष गवई महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या हस्ते देण्यात आला होता.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ राजीव राणे यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

  यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष सचिन कांबळे,तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे, तालुका संपर्क प्रमुख शिवम गायकवाड, अकलूज शहर संपर्क प्रमुख शिवाजी खडतरे,उमेश वाघमारे,अजय साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

Related posts

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे अकलूज येथे उद्‌घाटन..

yugarambh

अकलूज शहर बुरूड समाज व युवा मंच,अकलूज यांच्याकडून तिरंगा रॅलीचे आयोजन

yugarambh

युवा सेनेच्या वतीने गीतकार अब्दुल मुलाणी यांचा सत्कार : गणेश इंगळे

yugarambh

शाळेच्या नावाची कमान उभारणी करून महाराष्ट्र दिन साजरा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववस्ती( कोंडबावी )

yugarambh

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते दोन भीम गीतांचे प्रसारण

yugarambh

अकलूज कोविड सेंटरला लागलेल्या आगीत सुमारे ३ लाख १५ हजारांचे साहित्य जळून भस्मसात

yugarambh

Leave a Comment