अकलुज(युगारंभ )-लाखो रुग्णांना आपल्या संजीवनी उपचाराने जीवनदान देणार्या “माणसातील देवाला दिर्घायुष्य मिळो “अशा उत्फुर्त शुभेच्छा देत अनेक मित्र मंडळे,संघटना आणि नागरीकांच्या वतीने डाॕ.एम.के.इनामदार यांचा वाढदिवस उत्साही वातावरणात अकलुज येथे साजरा करण्यात आला.
वैद्यकीय क्षेत्राचे भुषण असणारे,सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपुर्ण राज्यातुन येणार्या रुग्णांना आपल्या अगाध वैद्यकिय ज्ञानाच्या जादुई उपचाराने अकलुज येथील प्रसिध्द ह्दय रोग तज्ञ् डाॕ.एम.के.इनामदार यांनी आयुष्यातील चाळीस वर्षे रुग्णसेवा केली.चाळीस वर्षे रुग्णसेवा करत असताना डाॕ.इनामदार यांच्या नजरेत पैसा हा गौण होता.अनेक दिन-दुबळ्यांच्या डोळ्यातील अश्रु पुसण्यातच त्यांना लाखो रुपये कमविल्याचा आनंद होत असे.त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्या रुग्णांमध्ये गरीब -श्रीमंत असा भेदभाव कधी पाहायला मिळाला नाही.उलट ज्यांनी स्वखुषीने जास्त दिलेच तर त्याच्या दुप्पट स्वःताचे टाकुन गरीब रुग्णांवर उपचार करणारे माणसातील देव,लाखो रुग्णांना धनवंतरी देवाच्या रुपात दिसणारे.अकलुजलाच नव्हे तर संपुर्ण राज्याला अभिमान वाटावा असे डाॕ.एम.के.इनामदार यांना दिर्घायुष्य लाभुन, त्यांच्या हातुन अशीच अखंड रुग्णसेवा घडत राहो. अशा आशयाच्या शुभेच्छा देत वाढदिवस साजरा करणार्या अनेकांनी दिल्या.
या नाविन्यपुर्ण कार्यक्रमात डाॕ.एम.के.इनामदार यांच्या सुविद्य पत्नीसौ.साधना इनामदार यांनी केक भरवुन शुभेच्छा दिल्या.चिरंजीव डाॕ.अनिकेत ,स्नुषा डाॕ.मानसी इनामदार,नातु अश्विन यांनी यावेळी शुभेच्छा देत कार्यक्रमाची शोभा वाढविली.
“सर्वांच्या सहकार्याने आणि शुभेच्छांच्या बळावर आपण इथुन पुढेही अविरतपणे रुग्णसेवा करतच राहु” असे मत डाॕ.एम,के.इनामदार यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी वैद्यकीय व्यवसायातील प्रतिथयश डाॕक्टर,आनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते,हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी या सर्वानी त्यांना शुभेच्छा दिल्या.