माळीनगर (युगारंभ )-दि मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर प्रशालेत थोर समाजसेवक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 195 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षिका स्वाती घोडके उमा महामुनी यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थिनी अमृता कांबळे, सरस्वती देवकर यांनी महात्मा फुले विषयी आपले विचार मांडले.त्यांना प्रशाले तर्फे शिक्षण संक्रमण व लेखन साहित्य देऊन प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच राजेश कांबळे,महेश शिंदे यांनी
महाराष्ट्र मातीचा,वाघाच्या छातीचा, सत्यशोधक तो मर्दाच्या जातीचा,असा होता जोतीराव माझा, लाखात एक
हे सुंदर गीत सादर केले.त्यांनाही गुलाबपुष्प देण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्राचार्य गिरीश ढोक उपप्राचार्य प्रकाश चवरे,वैशाली बनकर,मनीषा नलवडे,किशोरी चौरे,वैशाली पांढरे, माधुरी सुरवसे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली पांढरे,माधुरी सुरवसे आदींनी परिश्रम घेतले