अकलूज (युगारंभ )-राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे,राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ११एप्रिल जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
अकलूज मधील भाजी मंडई येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष सचिन कांबळे, अकलूज शहराध्यक्ष मिलिंद पवार, तालुका संपर्क प्रमुख शिवम गायकवाड,शहर संपर्क प्रमुख शिवाजी खडतरे, बन्नीभाई धाईंजे,शहाजी खडतरे, विशाल कांबळे,अजय साळुंखे,उमेश वाघमारे,बाबासाहेब ननवरे, अवि गायकवाड यांचेसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते