युगारंभ/ माळीनगर -क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त फुले- आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ माळीनगर यांचेवतीने रमामाता कॉलनी या ठिकाणी ध्वजारोहणाचा व अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सुगावंकर साहेब व त्यांचे सहकारी कर्मचारी उपस्थित होते.
दि सासवड माळी शुगर फॅक्टरी आणि ग्रामपंचायत माळीनगर यांचे वतीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र भाऊ गिरमे,कारखान्याचे होल टाईम डायरेक्टर सतिश आप्पा गिरमे,सरपंच अभिमान जगताप, अजित नाईकनवरे, नवनाथ कांबळे, सतीश लोंढे, मधुकर ओव्हाळ,अशोक कांबळे, अनिल बनकर, दादा दळवी, अशोक लोंढे आदी उपस्थित होते.
यशवंत आंबेडकर बुद्ध विहार माळीनगर या ठिकाणीही महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सरपंच अभिमान जगताप नवनाथ कांबळे प्रकाश कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी ,उमेश जगताप , बलभीम नाईकनवरे ,अजित नाईकनवरे,प्रभाकर सरोदे, अमोल जगताप,जितेंद्र दळवी, मधुकर ओव्हाळ, अशोक कांबळे, अशोक लोंढे, विकास कांबळे आदी. उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फुले- आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तसेच दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर विविध संस्था व संघटना यांनी परिश्रम घेतले.