अकलूज(कृष्णा लावंड )-: 2013-14 साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नामुळे मंजुर झालेल्या सुधारित पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईनच्या कामाला शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात गती मिळवून दिल्याने अखेर हि पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असून पंचवटी येथील नळांना तब्बल 32 वर्षानंतर पाणी आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
अकलूजची नगरपरिषद होण्याअगोदर अकलूज ग्रामपंचायतीच्या हद्दीत परंतु मुख्य गावापासून थोडेसे लांब असलेल्या पंचवटीत 32 वर्षापासून वॉटर सप्लाय च्या पाण्याची सोय नव्हती. येथील नागरीकांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बोअरच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. शिवतेजसिंह मोहिते-पाटील सरपंच पदावर असताना येथील नागरीकांनी त्यांना विनंती करून सर्व हकीकत सांगितली व वॉटर सप्लाय च्या पाण्याची सोय करून देण्याची विनंती केली.
यावर शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व शिवामृतचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 2013-14 साली मंजुर झालेल्या सुधारित पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पाईपलाईनचे काम आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सुमारे 15.34 कोटी रूपये खर्च करून सदरची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असून आज अखेर येथील नळांच्या तोटीला पाणी आले आहे.
याच योजनेअंतर्गत राऊतनगर, महादेवनगर, पंचवटी येथे उंच पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या असुन सदरच्या टाक्यामुळे महादेवनगर, समतानगर, रणजितनगर, अकलाईनगर, ठवरे प्लॉट, पंचवटी, राऊतनगर या भागातील जवळपास 15 ते 20 हजार लोकसंख्येला उच्च दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
पंचवटी येथे सुरू झालेल्या पाण्यामुळे येथील नागरीकांनी विजयसिंह मोहिते-पाटील व शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांचे आभार मानून पाण्याची पूजा केली व आनंदोत्वस साजर करत पाण्याचे स्वागत केले.
“आज 32 वर्ष मी येथे पंचवटीत राहत आहे आम्ही येथे राहायला आल्यापासून आम्हाला बोअरचे पाणी वापरण्याकरिता होते. शिवबाबा सरपंच असताना त्यांच्याकडे आम्ही वॉटर सप्लायच्या पाण्याची मागणी केली. त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळेच आज आमच्या दारात वॉटर सप्लायचे पाणी आले आहे. आम्हाला खूप आनंद आहे.”-जयश्री प्रकाश मिसाळ, पंचवटी