अकलुज(कृष्णा लावंड)-कोल्हापूरच्या पाटील याने माळशिरसच्या च्या विशाल बनकर याच्यावर पाच विरुद्ध चार गुणांच्या फरकाने विजय मिळवत महाराष्ट्र केसरीच्या गदेवर स्वतःचे नाव कोरले. वयाच्या एकविसाव्या वर्षी अवघ्या गदा पटकाविण्याची किमया त्याने साधली तर निगरवान खेळणाऱ्या विशाल बनकरचा शेवटच्या सव्वा मिनिटाने घात केला.
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब मैदान जिल्हा क्रीडा संकुलात झाली. अंतिम फेरीत दोन तगडे पैलवान दाखल झाल्याने या लढतीत कोण वाजी मारणार याची उत्कंठा शिगेला •पोहोचली होती.
हुंदका झाला अनावर……..पैलवानकी गाजवणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या विशालला महाराष्ट्र केसरीच्या स्वप्नाची वाटचाल करीत असताना आजोबा, चुलते महाराष्ट्र केसरी व वडिलांचे छत्र नियतीने हिरावले, त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर होता. यातच विशाल महाराष्ट्र केसरीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला. एकीकडे दुःख व दुसरीकडे हुंदका कुटुंबाला अनावर झाला.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, धैर्यशील मोहिते-पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह माळशिरस तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी विशालच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.