अकलुज(युगारंभ )-पोलिस कर्मचारी ज्या प्रकारे आपल्या गावातील,परिसरातील,देशातील गुन्हेगारी प्रवृत्ती साफ करून स्वच्छता करतात.त्या प्रमाणे आज अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस कर्मचारी वसाहत येथे अकलूज नगरपरिषद कर्मचारी यांनी पोलीस वसाहतीतील कचरा साफ करून आपले कर्तव्य पार पाडले.
अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी अकलूज शहर स्वच्छ,सुंदर,हरित व प्रदूषण मुक्त करण्याच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून आज सकाळी साडे सात वाजता नगरपरिषद कार्यालय परिसरात सर्व नगरपरिषद कर्मचारी यांना माझी वसुंधरा शपथ देण्यात आली.त्यानंतर जनजागृतीपर सायकल फेरी काढण्यात आली.
अकलूज पोलीस कर्मचारी वसाहत येथे स्वच्छता अभियान सुरुवात करण्यात आली.सदर परिसरात असलेल्या खेळाचे मैदान, ओपन जिम परिसरात मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे, कचरा साठला होता.अकलूज नगरपरिषद कर्मचारी यांच्या सोबत अकलूज पोलीस अधिकारी DYSP मा.डॉ.बसवराज शिवपूजे,अकलूज पोलीस अधिकारी PI मा. अरुण सुगावकर व पोलीस कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिम सहभाग घेऊन परिसरातील स्वच्छता करून, झाडांना पाणी घालण्यासाठी आळे केले व परिसर पोलीस कर्मचारी व पाल्य यांच्यासाठी स्वच्छ करण्यात आला.
अकलूज नगरपरिषद कर्मचारी वर्ग व पोलीस कर्मचारी वर्ग यांना स्वच्छते विषयी मोलाचे मार्गदर्शन करून यापुढे अकलूज पोलीस व नगरपरिषद कर्मचारी यांनी अशाच प्रकारे अकलूज परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्ती व परिसरातील कचरा, घाण साफ करून अकलूज परिसर स्वच्छ,सुंदर, हरित व प्रदूषण मुक्त करण्याचा निश्चय केला.