December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हा

मा.धैर्यशील(भैय्यासाहेब )मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थ्यांना  स्कुल बॅग वाटपाचा विधायक उपक्रम

अकलुज (युगारंभ )-मोहिते -पाटील कुटुंबातील प्रत्येकाच्या वाढदिवसाला समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.सामाजिक व राजकीय जीवनात विधायक उपक्रम राबविणारे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उपक्रमशील मित्रमंडळाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थ्यांना  स्कुल बॅग वाटपाचा राबविलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे पदिपादन जि.प.सदस्या शितलदेवी मोहिते-पाटील यांनी केले.

भारतीय जनता पक्षाचे संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धैर्यशील मोहिते-पाटील मित्रमंडळ, सिंहगर्जना ग्रुप,रॉयल रायडर्स, शिवरत्न व डॉटर्स मॉम फाऊंडेशन,दयावान प्रतिष्ठान, एस.बी.ग्रुपच्यावतीने अकलूज,माळेवाडी,आनंदनगर,बागेचीवाडी,कोंडबावी येथील जिल्हा परीषद शाळेतील सुमारे २ हजार ३०० विद्यार्थ्यांना स्कुल बॅग या शैक्षणिक साहित्याचे वाटपकरण्यात आले.

जि.प.सदस्या शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले .यावेळी माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील,गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख,माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, माजी ग्रा.पं.सदस्य क्रांतिसिंह माने पाटील, संजय साठे,गणेश वसेकर, राहुल जगताप,विशाल फुले, विशाल मोरे, किशोर राऊत,पं.स.सदस्या हेमलता चांगले,फातिमा पाटावाला, राजेंद्र काटकर,धैर्यशील मोहितेपाटील मित्रमंडळाचे प्रा.डाॅ.विश्वनाथ अवाड,नितीन बनकर,अनिल जाधव, श्रीकांत राऊत,रामकृष्ण काटकर, राजाराम गुजर, दत्तात्रय लिके, समाधान वाघमारे,तनवीर तांबोळी, माळेवाडीचे माजी सरपंच जालिंदर फुले,भारत,फुले,अरुण खंडागुळे, अनिसा काझी यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

  याप्रसंगी अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी कोरोनामुळे दोन वर्षानी शाळा भरल्या आहेत गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची गरज ओळखून धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळाच्या वतीने जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम राबविले जातात असल्याचे सांगितले.प्रारंभी प्रास्ताविकात नितीन बनकर यांनी धैर्यशील मोहिते-पाटील मित्र मंडळाने आजवर केलेल्या सर्व उपक्रमाची सविस्तर माहिती सांगितली.

     कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजाराम गुजर यांनी केले तर आभार रामकृष्ण काटकर यांनी मानले.

Related posts

राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या नावावर होणार जमिन.-आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषदेत केला होता पाठपुरावा

yugarambh

महर्षि संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

yugarambh

उत्कर्ष विद्यालय सांगोलाची प्रतापगड- रायगड दर्शन सहल उत्साहात संपन्न!

yugarambh

यशवंतनगर ‘महर्षि संकुल’ येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न

yugarambh

सहकार महर्षि कै.शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील यांना संग्रामनगर येथे अभिवादन

yugarambh

काँग्रेस नसती तर… ; राज्यसभेतील भाषणात पंतप्रधानांचा हल्लाबोल

Admin

Leave a Comment