एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे,सावध असा तुफानाची हिच खरी सुरुवात आहे…!
या उक्तीप्रमाणे ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण जिल्ह्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली... अकलूजचे दयावान,माळशिरसचे चाणक्य, सोलापूर जिल्ह्याचे किंगमेकर आणि आता राज्याचे तरुण नेतृत्त्व... म्हणून ज्यांची ओळख आहे...
अशा मित्राचा, राजकीय नेत्याचा, सर्वसामान्यांना वाटणाऱ्या आपल्या माणसाचा, भैय्यासाहेबांचा अर्थात धैर्यशील मोहिते पाटील यांचा जन्मदिवस….
आपल्या आजपर्यंतच्या कर्तुत्वसंपन्न जीवन जगण्यातून अनेकांना चैतन्याचा व नाविन्याचा मंत्र देणारे धैर्यशील मोहिते पाटील यांचे नेतृत्व हे विकासप्रिय नेतृत्व असुन, मागील काही वर्षापासुन आत्मविश्वास हरवलेल्या सैनिकासारखी अवस्था झालेल्या कार्यकर्त्यांना, नागरिकांना एकजुटीन
‘पेटलं रान, तुफान आलया ‘ चा संदेश धैर्यशील भैय्याच्या चतुरस्त्र व धुरंदर नेतृत्वाने दिला असुन जिल्हयाच्या वातावरणात उत्साह संचारला आहे .
आलेल्या कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी व त्यात त्यांचे दिसणारे नेतृत्वाचे कसब त्यामुळे, लढवय्ये नेतृत्व म्हणून त्यांची जिल्ह्यात खास ओळख निर्माण झाली आहे . संघर्ष अटळ आहे,पण त्यात भिडण्याच्या त्यांच्या तयारीमुळे त्यांच्या नेतृत्वातील परिपक्वता दिसुन येत आहे . राजकारण कितीही किचकट झाले असले तरी त्यात टिकून राहण्याच्या त्यांच्या नेतृत्व गुणामुळे त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने एक राजकीय दबदबा निर्माण केला आहे .
राजकारणात कोणी येत असते, जात असते पण आपल्याकडे आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देवून जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात एक वेगळी ताकद निर्माण केली आणि या ताकदीला धैर्यशील मोहिते पाटलांच्या नेतृत्वामुळे उर्जीतावस्था प्राप्त झाली आहे .
पुर्वीपासुनच मोहिते पाटलांची जिल्ह्यामध्ये एक ताकद आहे, पण नव्या पीढीला युवा प्रतिभावंताचा नेता मिळाला आहे . आज जिल्ह्यामध्ये राजकारणाची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे . चांगल्या माणसाला त्यांच्या कार्याला विरोध करण्याची वृत्ती वाढत चालली आहे . पुर्वी जिल्ह्याच्या राजकारणात जेष्ठ मंडळीचा सल्ला ऐकला जायचा पण सध्या ती परिस्थिती राहीली नाही . सहकार क्षेत्रातल्या निवडणुका तर लागतच नव्हत्या मात्र अलीकडील काळात याचे पेव फुटलेले दिसत असुन, अपप्रवृत्तीच्या लोकांनी राजकारणातील खालच्या पातळीचे टोक गाठले आहे . त्यामुळे राजकारण हे गल्लाभरूचे क्षेत्र झाले असुन गल्लीच्छ राजकारण करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे .
पक्षनिष्ठा , त्याग अशा गोष्टी आता मातीमोल होतचालल्या असुन चांगल्या माणसाची कमतरता जाणवू लागली आहे . त्यामुळे चांगल्या माणसाला राजकारण करताना प्रचंड त्रास होताना दिसुन येत असुन,अशा अवस्थेतही धैर्यशील भैय्याच्या कणखर व बाणेदार नेतृत्वाने राजकारणाची विश्वासार्हता टिकून ठेवली आहे . राजकारण करत असताना नेहमी त्यांनी सकारात्मक विचार रूजविला असुन जिल्ह्याच्या फायद्याचा नेहमी विचार केला आहे . जे नसतील त्यांच्याशिवाय व जे येतील त्यांच्याबरोबर जिल्ह्याच्या विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजपर्यंत कार्य केले आहे .
पक्षीय राजकारणात वादंग अटळ असतात पण प्रत्येक वादंगाला त्यांनी यशस्विपणे हाताळले आहे . कुणाशीही कटू वैर न धरता राजकारणातील मोहिते – पाटील घराण्याची परंपरा त्यांनी अत्यंत कौशल्याने जपली आहे . आज जिल्ह्याच्या राजकारणापासुन मोहीते पाटलांना दुर ठेवण्याच्या उदंड खेळ्या सुरू आहेत पण धैर्यशील भैय्याच्या झुंजार नेतृत्वामुळे त्यांच्या त्या खेळ्या केविलवाण्या ठरत आहेत .
या उगवत्या नेतृत्वाविषयीं…..
*जरी वर्तमानाला कळेना आमुची भाषा,विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही*
-बाळासाहेब रावसाहेब पराडे पाटील.
(जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्हा.) (चेअरमन विजयसिंह मोहिते वि.का.स.सोसायटी बाभूळगाव.)