अकलूज (युगारंभ )-सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग अकलूज प्रशालेत भारतीय संविधानाचे शिल्पकार,महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात “महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे ही शिक्षकांची जबाबदारी” असल्याचे मत पत्रकार गणेश करडे सर यांनी व्यक्त केले
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री जयसिंह मोहिते-पाटील प्राथमिक शाळा संग्रामनगरचे प्रभारी मुख्याध्यापक तथा पत्रकार गणेश करडे सर उपस्थित होते.तर अध्यक्ष स्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका नूरजहाॅ शेख या होत्या.मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थी अक्षरा काटे,स्वराज मोहिते व प्रशालेतील शिक्षिका रेश्मा देशमुख मॅडम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक जीवनकार्याचा आढावा आपल्या भाषणातून सांगितला.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.करडे सर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक विचार आणि सद्य सामाजिक स्थिती यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाकर चव्हाण,प्रकाश मगर,सुवर्णा क्षिरसागर,अलका भोसले,पवन बाजारे यांनी कष्ट घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती गायकवाड यांनी केले.
याकार्यक्रमास प्रशालेचे सर्व शिक्षक – शिक्षकेतर वृंद,विद्यार्थी उपस्थित होते.