December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने कॅलेंडर प्रकाशन व जिलेबी वाटप

अकलूज (युगारंभ )-भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन करून कॅलेंडर प्रकाशन व जिलेबी वाटप करण्यात आली.

प्रथम अकलूज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अकलूज येथील प्रसिद्ध डॉक्टर एम के इनामदार, उपविभागीय पोलिस अधिकारी शिवपुजे,डॉक्टर राजीव राणे,डॉ विवेक गुजर, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, रिपाई आठवले राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, अकलूजचे माजी सरपंच विठ्ठल गायकवाड,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर वरील मान्यवरांच्या हस्ते महामानव जयंती दिनदर्शिका कॅलेंडरचे प्रकाशन करून जिलेबी वाटप करण्यात आली.

यावेळी वरील मान्यवरांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

      यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष सचिन कांबळे, तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे,युवक तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड,तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे,उपकार्याध्यक्ष अमित जवंजाळ,तालुका संघटक पांडुरंग चव्हाण,जिल्हा संपर्कप्रमुख नवनाथ हुंबे,पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन जाधव,अकलुज शहराध्यक्ष मिलिंद पवार, माळशिरस तालुका संपर्कप्रमुख शिवम गायकवाड, अकलूज शहर संपर्क प्रमुख शिवाजी खडतरे,शहाजी खडतरे,अजय साळुंखे,आकाश गायकवाड, बाबासाहेब ननवरे,तालुका उपाध्यक्ष शरद साठे, प्रशांत भोंडवे,राजू बागवान,अकलूज शहर कार्याध्यक्ष स्वप्निल शिरसट, अशोक कोळी आदींसह पदाधिकारी भीमसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

Related posts

प्रताप क्रीडा मंडळाच्या समूह नृत्य स्पर्धेस दिमाखात प्रारंभ.. प्राथमिक गटात महर्षि प्राथमिकची बाजी.

yugarambh

महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांना खिचडीचे वाटप

yugarambh

सदाशिवराव माने विद्यालय  प्राथमिक शाळा,अकलूज येथे स्वातंत्र्यदिन साजरा 

yugarambh

शाळेच्या नावाची कमान उभारणी करून महाराष्ट्र दिन साजरा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववस्ती( कोंडबावी )

yugarambh

हलदहिवडी ता. सांगोला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा फाळके बिनविरोध

yugarambh

अकलूज कोविड सेंटरला लागलेल्या आगीत सुमारे ३ लाख १५ हजारांचे साहित्य जळून भस्मसात

yugarambh

Leave a Comment