December 1, 2023
yugarambh
Breaking News
ठळक बातम्यापरिसर

आदिवासी पारधी कॅम्प सवतगव्हाण येथे पहिल्यांदाच डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

माळीनगर(युगारंभ )-सवतगव्हाण ता. माळशिरस जि. सोलापूर येथे आदिवासी पारधी समाज बांधवांनी पहिल्यांदाच विश्वरत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.अशा प्रकारे सार्वजनिक जयंती प्रथमच झाल्याचे तेथील बांधवांनी सांगितले.

शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय  सर्वच क्षेत्रात पिछाडलेला समाज असलेल्या आदिवासी पारधी  समाज अशी ओळख आहे.परंतु रवि शंकर काळे ग्रामपंचायत सदस्य सवतगव्हाण यांच्या .  संकल्पकतेतून, सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला. 

        या कार्यक्रमास नितीनराजे निंबाळकर, उपसरपंच बनसोडे मॅडम, शंकर टामा काळे, संगाप्पा टामा काळे, माळीनरचे सरपंच अभिमान जगताप, माळीनगर सवतगव्हाण येथील बहुजन बांधव उपस्थित होते.

       जर बाबासाहेबांनी घटनेमधून आदिवासी पारधी समाजाला आरक्षण दिले नसते तर आजही हा समाज जंगलातून बाहेर पडला नसता, तिथेच आपले जंगली आयुष्य जगत राहिला असता.माणुस म्हणुन जगण्याचे स्वातंत्र्य आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळे मिळाले त्यामुळेच त्यांनी दाखवलेल्या शिक्षणाच्या मार्गावर जाऊन आपण आपले कार्यकर्तुत्व सिद्ध केले पाहिजे त्यासाठी युवकांनी MPSC, UPSSC यांसारख्या स्पर्धा परिक्षेत सहभाग घेतला पाहिजे.असे मत पारधी समाजाचे युवा नेतृत्व रवि काळे यांनी केले.

   अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी पेरलेल्या विचारांचा विजय असल्याचे बोलले जात आहे.तसेच शिक्षणाच्या प्रवाहात येवून सामाजिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारे सर्व समाजाने पुढे येवून विचार आत्मसात करणे गरजेचे आहे.

Related posts

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिना निमित्त गणेश नगर अकलूज येथे पाणीपुरी फ्री 

yugarambh

जि. प. आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न

yugarambh

वाफेगाव ता. माळशिरस येथे अनैतिक संबंधातुन महिलेचा खून

yugarambh

मंत्री  सावंत यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार गणेश जाधव यांचे मेल द्वारे निवेदन.

yugarambh

पायरी पूल ता.माळशिरस येथे बसचालकाने मुलास उडवले

yugarambh

मुलींचा शारिरीक विकासातून सर्वागिण विकास व्हावा…. डाँ.प्रिया कदम

yugarambh

Leave a Comment