माळीनगर (युगारंभ )- थोर समाजसेवक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेमध्ये भारतीय संविधानाचे अंतरंग पुस्तिकेचे वाटप विद्यार्थी व शिक्षकांना करण्यात आले.
महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य गिरीश ढोक उपप्राचार्य प्रकाश चवरे,पर्यवेक्षिका स्वाती घोडके व शिक्षक बाळासाहेब भोसले, माळीनगर यांच्या हस्ते करण्यात आले.
कु. ऐश्वर्या बाळासाहेब भोसले हिची एमपीएससी २०१९ मार्फत झालेल्या परीक्षेत जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक इंजिनीयर पदी निवड झाल्याबद्दल तिचे वडील बाळासाहेब भोसले यांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थिनी निलोफर शेख,बाळासाहेब भोसले,प्राचार्य गिरीश ढोक यांनी आपले विचार व्यक्त केले तर राजेश कांबळे,महेश शिंदे,जगन्नाथ कोळी यांनी गीत गायन करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामहरी वायचळ यांनी केले तर आभार सुनील शिंदे यांनी मानले कार्यक्रमासाठी कमलाकर फरताडे,संतोष पाटोळे,महेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
