इंदापूर (युगारंभ )-पंचायत समिती इंदापूर येथे मा. गटविकास अधिकारी विजयकुमार परीट साहेबांच्या संकल्पनेतून आझादी का अमृत महोत्सवांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील उमेद अभियानाच्या महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महिलांना गटविकास अधिकारी साहेब,संरक्षण अधिकारी साहेब व वकील साहेबांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी तालुका व्यवस्थापिका राणी ननवरे,CC समाधान भोरकडे, डी. जे. राऊत, राम कांबळे,सुनीता दातखिळे, निर्मला निमगिरे व महिला उपस्थित होत्या.
महिलांना आवश्यक असणाऱ्या कायदेविषयक बाबींचे ज्ञान या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे मिळाल्याचे समाधान उपस्थित महिलांनी केले. त्याबद्दल पंचायत समिती इंदापूर व कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी विजयकुमार परीट साहेब यांचे आभार व्यक्त केले.