अकलूज (युगारंभ )-अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालय येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आयोजित भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
२२/४/२०२२ रोजी वार शुक्रवार वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे या आरोग्य मेळाव्याचे आयोजन केले असून या आरोग्य मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांसाठी सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.
- यामध्ये डिजिटल हेल्थ आय.डी (युनिक हेल्थ आय.डी)
- आयुष्यमान भारत कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे,
- पासपोर्ट साईज फोटो,
- केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड,
- आधार कार्ड,
- मतदान ओळखपत्र
- मूळ कागदपत्र व सोबत झेरॉक्स प्रत्येक दोन प्रतीत आणायचे आहेत.
तसेच सर्व रोग मोफत तपासणी विशेषज्ञ डॉक्टरांनी मार्फत यामध्ये हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदूचे आजार, फुफ्फुसांचे आजार, कॅन्सर, गरोदर माता व स्त्री-तपासणी, लहान मुलांचे आजार, किडनी आजार, मोतीबिंदू, त्वचारोग, गुप्तरोग, कान-नाक-घसा आजार, अस्थिरोग,एच.आय.व्ही. तपासणी क्षय रोग, दंतरोग, कुष्ठरोग व इत्यादी सर्व आजारांचे या ठिकाणी सर्व रोग मोफत तपासणी केली जाणार आहे. तसेच मोफत रक्त, लघवी एक्स-रे व ई.सी.जी गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत दिली जातील.
सदर शिबिरामध्ये स्नेहांकित म्हणून विजयसिंह मोहिते पाटील (माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) तसेच रणजितसिंह नाईक- निंबाळकर (खासदार माढा मतदारसंघ) रणजितसिंह मोहिते पाटील (आमदार विधान परिषद) राम सातपुते (आमदार माळशिरस तालुका) हे प्रमुख उपस्थित राहणार असून
सदर शिबिरासाठी आय. एम.ए. अकलूज, केमिस्ट व ड्रगिस्ट असो.अकलूज, रोटरी क्लब, अकलूज, इनरव्हील क्लब अकलूज, रोटरी क्लब सराटी डिलाईट, सोलापूर कॅन्सर हॉस्पिटल सोलापूर, विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग कॉलेज शंकरनगर अकलूज यांचे सहकार्य लाभले आहे.