माळीनगर(युगारंभ )-येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेचे माजी शिक्षक हरिदास कृष्णा कांबळे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांची धान्यतुला करण्यात आली.
येथील सौभाग्य मंगल कार्यालयात कार्यक्रम पार पडला.धान्यतुलेतील गहू,तांदूळ,साखर,रवा, हरभरा डाळ या वस्तू पंढरपूर येथील पालवी आणि नवरंगे बालकआश्रमात देण्यात येणार आहे.यानिमित्ताने रुद्राभिषेक,नवग्रह शांती,कारखान्याच्या परिसरातील गहिनीनाथ महाराज व शंकर महाराज मंदिरात अभिषेक करण्यात आला.
दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे,माजी पूर्णवेळ संचालक विलास इनामके,संचालक निखिल कुदळे,पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाषदादा निंबाळकर,महात्मा फुले पतसंस्थेचे उपाध्यक्ष महादेव एकतपूरे,डॉ.विवेक गुजर,डॉ. संतोष खडतरे,डॉ.अतुल फडे,शुगरकेन सोसायटीचे अध्यक्ष घनश्याम भोंगळे,दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अजय गिरमे,सचिव ऍड.सचिन बधे,खजिनदार सुरेश राऊत,संचालक अनिल रासकर,रत्नदिप बोरावके,डॉ.अविनाश जाधव,कुणाल इनामके, कल्पेश पांढरे,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे आदी मान्यवरांनी उपस्थितीत राहून श्री.कांबळे यांचे अभिष्टचिंतन केले.