अकलूज (युगारंभ )-दिनांक 19 एप्रिल 2022 रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे येथे शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक 1चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.जि.प.सदस्या सौ.मंगलताई वाघमोडे, चाकोरे गावच्या सरपंच सौ.अर्चनाताई शिंदे,मा.सरपंच श्री. किरणअप्पा वाघमोडे, ग्रा. पं. सदस्य श्री.सचिन कचरे, शा.व्य.समिती अध्यक्ष धनंजय वाघमोडे,उपाध्यक्ष शामराव आरडे, सदस्य प्रवीण कचरे, संतोष शिंगटे,आबासो कोळेकर, महादेव विरकर, सुभाष पाटील, शिवाजी शिंदे सोमनाथ शिंगटे, मारुती नलवडे, चांगदेव कुंभार,अनेक ग्रामस्थ व माता पालक, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस व शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रभात फेरी ने कार्यक्रमाची सुरुवात झाली यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी चे सर्व विद्यार्थी हातामध्ये फलक घेऊन घोषणा देत बँड पथकासह सहभागी होते. जून 2022 मध्ये इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मिरवणूक सजवलेल्या बैलगाडीतून गावातून काढण्यात आली.
प्रभात फेरी नंतर विद्यार्थ्यांच औक्षण करून त्यांचं शाळेत पडणारं पहिलं पाऊल (पावलांचे ठसे) घेऊन त्यानंतर त्यांना फुगे, गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली मधील 19 विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
तदनंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाळासो शिंदे यांनी केले. शाळा पूर्वतयारी उपक्रमांतर्गत असणाऱ्या सात स्टॉलवर सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदी घेऊन त्यांच्या कलागुणांची व विविध क्षमतांची नोंद घेण्यात आली. प्रत्येक स्टॉल साठी शाळेतील शिक्षक,शिक्षिका, अंगणवाडी सेविका,स्वयंसेवक यांची नेमणूक केलेली होती.
कार्यक्रमाचं आकर्षण ठरलं ते शाळेतील शिक्षक श्री.पठाण सर यांनी तयार केलेला सेल्फी पॉइंट.सर्व दाखल पात्र विद्यार्थ्यांचे सेल्फी काढण्यात आले.
कार्यक्रमाचे फलक लेखन श्री.पठाण सर यांनी केले तर बैलगाडी सजावट श्री. राजगुरू सर यांनी केली. कार्यक्रमासाठी आकर्षक रांगोळी शाळेतील शिक्षिका श्रीम. सपकळ मॅडम व श्रीम.गायकवाड मॅडम यांनी काढली. तसेच प्रभात फेरी चे नियोजन श्री.लवटे सर व श्री.कदम सर यांनी केले.
यावेळी उपस्थित असणारे सर्व नवागत विद्यार्थी, पालक व माता पालक यांना शाळेतील सर्व शिक्षकांनी व अंगणवाडी सेविकांनी आपआपल्या स्टॉलवर शाळापूर्व तयारी विषयी मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयी व शिक्षकांनी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल कौतुक केले.
शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने खाऊवाटप करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राजगुरू सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.लवटे सर यांनी मानले.