माळीनगर (युगारंभ )-प्राथमिक आरोग्य केंद्र माळीनगर येथे दि.21/04/2022 रोजी सकाळी 10 वाजता जंतनाशक मोहीम प्रशिक्षण आयोजित आले.
माळशिरस तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य अधिकारी डाॅ. संकल्प जाधव यांच्या सहकार्यातून सर्व जिल्हापरिषद शाळा खाजगी, प्राथमिक माध्यमिक, स्वयं अर्थसहाय्यित शाळा मधील एका नोडल शिक्षकासाठी हे प्रशिक्षण घेण्यात आल्याचे आरोग्य सहाय्यक दादासाहेब फुंदे यांनी सांगितले.
1 ते 19 वयोगटातील विद्यार्थी असणाऱ्या शाळा जंतनाशक मोहीम शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असल्याने प्रशिक्षणासाठी प्रत्येक शाळेतून एक नोडल टीचर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे विषयी सूचित करण्यात आले होते.
सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. सदर प्रशिक्षणास माळीनगर आरोग्य उपकेंद्र अंतर्गत येण्यार्या सर्व शाळांचे शिक्षक उपस्थित होते.