अकलूज (प्रतिनिधी):-राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे,राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी पंढरपूर तालुक्याच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
पंढरपूर तालुक्यातील जळोली या गावामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच मिरवणूक काढण्यात आली यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, जळोली गावचे सरपंच ज्योतीराम मदने व्हाईस चेअरमन समाधान नरसाळे जळोली शाखा अध्यक्ष विशाल सुरवसे यांच्या हस्ते करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली त्यानंतर जळोली गावामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा संपर्कप्रमुख नवनाथ हुंबे पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन जाधव तालुका सरचिटणीस गणेश गायकवाड जळोली गावचे अध्यक्ष विशाल सुरवसे माळशिरस तालुका अध्यक्ष सचिन कांबळे तालुका युवक संपर्कप्रमुख सोहम गायकवाड अकलूज शहर कार्याध्यक्ष स्वप्नील शिरसाठ शहर संपर्क प्रमुख शिवाजी खडतरे उंबरे शाखा अध्यक्ष राजू गायकवाड जळोली उपाध्यक्ष पद्माकर कांबळे बलभीम पाटील धर्मा नवगिरे नागनाथ शिंदे गणेश नवगिरे अमोल गाडेकर विशाल नवगिरे संकेत नवगिरे करण नवगिरे आकाश गायकवाड राजू बागवान यांचेसह मोठ्या संख्येने भीम सैनिक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.या मिरवणुकीचे नियोजन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जळोली गावचे अध्यक्ष विशाल सुरवसे यांनी केले होते.