युगारंभ/ माळीनगर -जिल्हा परिषद सोलापूर शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनक सूचनांनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावबहाद्दूर गट बिजवडी येथे शाळापूर्व तयारी विद्यार्थी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
सुरूवातीला हलगीच्या गजरात प्रभातफेरी काढून शैक्षणिक वातावरण निर्मिती करून नंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्रीकांत राऊत यांनी केले. दाखलपात्र विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करून मुलांना फुगे , चाकलेट, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विविध प्रकारच्या 7 शैक्षणिक स्टाॅलद्वारे विविध साहित्याची मांडणी करत शारीरिक विकास, भावनिक विकास, बौद्धिक विकास, भाषा विकास, भावनिक विकास व गणनपूर्व तयारी आदी बाबींची माहिती उपस्थित पालक व मातांना देण्यात आली.
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख साहेब, केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इ. 1 ली मध्ये दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आभार श्रीकांत राऊत यांनी मानले.
या कार्यक्रमास मनोज तात्या शिंदे, दत्तू जाधव, अक्षय मोहिते, गणेश नागरगोजे,अश्विनी गरूड, सुनिता जगताप, वर्षा मदने, शहनाज नदाफ, सारिका चव्हाण, गिरीजा चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यास मुख्याध्यापक प्रकाश क्षीरसागर, उपक्रमशील शिक्षक श्रीकांत राऊत यांनी कष्ट घेतले.