श्रीपूर ( युगारंभ ) –“श्री यमाईदेवी माता प्रतिष्ठान” यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून माकडांना पिण्याची पाण्याची सोय तसेच मंदिरात येणा-या भाविक –भक्तांना देखील पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी यासाठी श्री नितीन नाटकळे, महावीर शेंडगे, राजू शिवणगी, कानिफनाथ अहिरे, शरद पोळ, टी.जी. माने सर, दयानंद जवाहिरे यांच्या लोकवर्गणीतून 2000 लिटर पाणी साठवण क्षमता असलेली टाकी दि. 22/04/2022 रोजी “श्री यमाईदेवी माता प्रतिष्ठान” महाळुंग यांच्या वतीने भेट म्हणून ज्येष्ठ नागरिक श्री जगन्नाथ (अण्णा) गणेशकर यांच्या शुभहस्ते मंदिराचे पुजारी – गुरव बंधूं यांच्याकडे देण्यात आली.
दरवर्षी कडक उन्हाळ्यामध्ये मंदिर परिसरातील बारवामधील पाणी कमी झाल्यामुळे, त्या आवारात असणा-या माकडांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाल्यामुळे माकडे पाण्यासाठी सैरा वैरा गावात पिरू लागली. तसेच मंदिरात येणा-या भाविक – भक्तांना देखील पाण्याची गैरसोय होऊ लागली.
यावेळी “श्री यमाईदेवी माता प्रतिष्ठानचे श्री संजयकुमार शिवाजी घोंगाणे, विक्रांत (पप्पू) रेडे, लखन धुमाळ, सुधीर भोसले, दादा भोसले, सुरेश यादव, नितीन गुंड, हारुण डांगे, श्री चव्हाण, अक्षय चव्हाण, शिवा माने इ सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.