युगारंभ /संग्रामनगर -राष्ट्रीय जंतनाशक दिना निमित्त श्री जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय -प्राथमिक शाळा संग्रामनगर येथे जंतनाशक गोळ्याचे वाटप आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.
राष्ट्रीय जंतनाशक मोहीम अतंर्गत तालुका वैद्यकीय अधिकारी रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अधिकारी संकल्प जाधव यांच्या सहकार्यातून राबविण्यात येत आहे.
यावेळी आरोग्य सहाय्यक दादासाहेब फुंदे, हनुमंत भानवसे आरोग्य सेविका जीवनकला रोटे, आशा सेविका सविता मोदळे उपस्थित होते. तसेच प्राथमिक विभाग प्र. मुख्याध्यापक गणेश करडे, नोडल टीचर विलास कस्तुरे,दत्तात्रय गव्हाणे, रशीद मुलाणी, रविंद्र कवटे, आरती दोरकर, जानकी वनवे, सुवर्णा पवार, शुभांगी कदम,नवनाथ राऊत, शिला भूमकर आदी उपस्थित होते.
यावेळी एकूण 213 विद्यार्थांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.विद्यार्थी पालक उपस्थित होते.ज्या विद्यार्थ्यांनी जंतनाशक गोळी घेतली नाही त्यांना 29 एप्रिल रोजी शाळेत अथवा अंगणवाडीत गोळ्या वाटप करण्यात येणार असल्याचे आरोग्य सेविका जिवनकला रोटे यांनी सांगितले.