बीड (विशेष प्रतिनिधी )-ता.परळी मौजे नागदरा येथे होलार समाज बांधवांच्या वतीने देशाचे खरे राष्ट्रपिता, क्रांतिबा महात्मा फुले व विश्वरत्न महामानव, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन होलार समाजाच्यावतीने करण्यात आले असता, नागदरा परिसरातील सर्व बहुजन समाजातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक तथा महिला मोठ्या संख्येनें ऊपस्थित होते.
या जयंती महोत्सवाचे प्रमुख आकर्षण अर्थात प्रबोधन सत्राचे आयोजन त्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व्याख्याते, आंबेडकर प्रबोधन चळवळीचा सत्यशोधक व बुलंद आवाज प्रा.एम.एम.सुरनर सर यांचे व्याख्यान आयोजित केले असता प्रा.सुरनर सरांनी महामानवांचे विचार मांडत असताना समाजातील सामाजिक व जातीय सलोखा कायम राखण्यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेले संविधान व त्यातील समता, स्वातंत्र्य, न्याय, व बंधुता या चार मुल्यांना प्रवर्धित करण्यासाठी आपण सतत क्रियाशील राहुन समाजात जागृती केली पाहिजे व महापुरषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांच्या विचाराना डोक्यात घेऊन त्याप्रमाणे आचरण केले तर समाजात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य करत ऊपस्थित जनसमुदायास संबोधित करताना अनेक महापुरूषांचा वैचारिक वारसा सर्व समाजातील लोकांनी जपला पाहिजे ईतकेच नाही
तर ,मुलींना ऊच्च शिक्षण देत त्यांना वकील, डॉक्टर, ईंजिनीयर, प्राध्यापक, जिल्हाधिकारी अशा मोक्याच्या व मोठ्या पदावर जाऊन समाजाच्या विकासासाठी सुशिक्षित तरूणांनी पुढाकार घेतला पाहिजे व समाजप्रगतीसाठी महिलांना त्यांच्या हक्क व आधिकाराची जाणीव करून देत त्यांना अन्यायाच्या विरूध्द लढण्यासाठी तयार केले पाहिजे तोच खरा महामानवाच्या विचाराचा खरा वैचारिक वारसदार होय असे ऊपस्थित जनसमुदायास संबोधित करताना प्रा.सुरनर सरांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सुनिल घुले तर ऊदघाटक म्हणुन ग्रामसेवक नितीन गित्ते तर प्रमुख ऊपस्थिती म्हणुन चलो भिमकी ओर चे मराठवाडा संयोजक आयु.एकनाथरावजी जाहीर, तसेच रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष आयु.अजयजी गोरे, चलो भिमकी ओर चे लातुर जि.संयोजक आयु चंद्रकातजी टाळकुटे आयु.जयदेव खांडेकर,आयु विठ्ठल आवळे, आयु. अमोल गोडबोले , आदि ऊपस्थित होते कार्यक्रमाचे
कार्यक्रमाचे संचलन सुप्रसिध्द निवेदक आयु.बळीराम पारसे, यांनी तर प्रास्ताविक ग्रा.पं.सद्स्य आयु. माणिक ब्रिंगणे यांनी केले तर आभार संतोष ब्रिंगणे यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाजातील महिला, पुरूष, तरूण व युवकांनी परिश्रम केले..