माळीनगर (युगारंभ )-भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माळीनगर परिसरातील आजी-माजी सैनिकांचा सत्कार समारंभ सोहळा माळीनगर ग्रामपंचायतच्या वतीने संपन्न झाला प्रसंगी माजी सैनिक यांनी शिवलाल बोबडे आपले मनोगत व्यक्त केले. तसेच माजी सैनिक वसंत शिंगाडे यांना आजारपणामुळे चालता येत नसल्याने त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने घरी जाऊन विशेष सन्मान करून माजी सैनिकांविषयी संवेदना व्यक्त केली .
यावेळी स्वातंत्र्यसैनिक आजी-माजी सैनिक यांचे देशाला लागलेले योगदान यासंदर्भात सरपंच अभिमान जगताप यांनी आपले मत व्यक्त करून त्यांचा सन्मान सोहळा साजरा केला.
तसेच एक दिवस सैनिकासाठी घोषित केला यावेळी माजी सैनिक शिवलाल बोबडे , विलास जाधव, परिसरातील आजी माजी सैनिक , ग्रामसेवक ए.जे रकटे , सदस्य संग्राम भोसले , महादेव बंडगर , विकास कांबळे , यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिक राजेश शिंदे यांनी सुत्रसंचालन केले तर आभार संग्राम भोसले यांनी मानले .
