लातूर (विशेष प्रतिनिधी )-लातुर जिल्ह्यातील, चाकुर तालुक्यातील मौजे अलगरवाडी येथे होलार समाजाच्या वतीने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रसंगी महामानवाचा विचार आणि कार्य हे जातीपुरते मर्यादित नसुन या देशातील तमाम शोषित , पिढीत, वंचीत घटकासाठी व त्यांच्या ऊत्थानासाठीचे त्यांचे कार्य होते असे लक्षात घेऊन अलगरवाडी येथील होलार समाजातील सर्व समाज बांधवानी स्मृतिशेष राम होनमाने साहेब यांची प्रेरणा लक्षात घेत व चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य होलार समाजाचे ज्येष्ठ विचारवंत, होलार समाज परिवर्तनाची दिशा या पुस्तकाचे लेखक प्रा. आयु.वैजनाथ सुरनर सर यांच्या मार्गदर्शनातुन हा परिवर्तनाचा देखणा सोहळा ऊभा करण्यात आला होता.
लातुर जिल्ह्याचे सुप्रसिध्द विधिज्ञ ऍड आयु.रमेशजी विवेकी सर यांनी कायद्याची जाणीव जागृती झाली पाहिजे व सोबतच त्यांना आय पी सी काय आहे ते समजले पाहिजे यासाठी याच जयंतीचे औचित्य साधुन या गावातील १०० घरातील प्रत्येक नागरिकांना आय.पी.सी.चे एक ३३५ रू किंमतीचे पुस्तक मोफत वितरीत केले व समाजातील सामाजिक सलोखा टिकुन राहिला पाहिजे यासाठी ही सामाजिक बांधिलकी जपणारी कृती निस्वार्थपणे लातुरचे सुप्रसिध्द विधिज्ञ ऍड आयु रमेश विवेकी सरांकडून समाजाला पहावयास मिळाली.
या संयुक्त जयंतीचे औचित्य साधुन महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व्याख्याते तथा आंबेडकरी चळवळीचा सत्यशोधक , बुलंद आवाज प्रा.एम.एम. सुरनर सर यांच्या विद्रोही व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते प्रा.सुरनर सर यांनी महामानवांच्या संयुक्त जयंती निमित्ताने आपले विचार मांडताना म्हणाले की महाराष्ट्रातील होलार आता महामानव, राष्ट्रपिता ज्योतिबाबा , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आत्मसात करत आहेत व परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहेत हेच परिवर्तन आहे असा विचार व्यक्त करत ते म्हणाले एक दिवस असा येईल की संबंध महाराष्ट्रातील होलार समाज बाबासाहेबांना अपेक्षित वर्तन करेल व महामानवाचे राहिलेले अधुरे स्वप्न पुर्ण करण्यासाठी जिवाची बाजी लावेल असा आशावाद व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी अनेक प्रसंग सांगताना समाजातील अनिष्ठ चालीरीती, रूढी, पंरपंरा याला मुठमाती देत समाजाने शिक्षण घेतले पाहिजे व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेले संविधान वाचुन त्यातील हक्क आधिकाराचे वापर करून मोठं मोठ्या पदावर गेले पाहिजे , डॉक्टर, वकिल, ईंजिनीयर, जिल्हाधिकारी झाले पाहिजे व समाजाच्या ऊन्नतीसाठी कार्य केले पाहिजे व्यसनमुक्त झाले पाहिजे तरूणांनी असे अनेक परिवर्तनवादी विचार मांडत ऊपस्थित जनसमुदायाचे प्रबोधन केले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन गावचे प्रथम नागरिक गोंविद माकणे तर प्रमुख पाहुणे म्हणुन चाकुर नगरीचे प्रथम नगराध्यक्ष आयु.मिलींदजी महालिंगे, ज्येष्ठ पत्रकार रंगनाथ वाघमारे, आयु.सोबतच चाकुर नगरीचे विद्यमान नगरसेवक आयु.पपनजी कांबळे , युवानेते वर्धमान कांबळे आयु जयदेव खांडेकर आदि प्रमुख पाहुणे ऊपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन फिनिक्स अकॅडमीचे संचालक आयु चंदर टाळकुटे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती कमिटीचे सर्व पदाधिकारी व अलगरवाडी येथील सर्व युवक, युवती, महिला व पुरूषांनी मेहनत केली चाकुर पंचक्रोशितील हजारो लोक ऊपस्थित होते….