लवंग(युगारंभ )-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठया उत्साहाने लवंग (भिलारे वस्ती )ता. माळशिरस येथे साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रतिमा पूजन लवंगचे मा. सरपंच उत्तम बापू भिलारे, श्रीमंत गायकवाड सर, तुकाराम भिलारे, धनाजी पवार, प्रशांत भिलारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक संपूर्ण वस्तीमधून काढण्यात आली.या मिरवणुकीत लहानापासून वृद्धापर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला.कमी लोकसंख्या असलेल्या भिलारे वस्तीवर सर्व जाती धर्माचे लोक कित्येक वर्ष एकत्र राहत असून शिवजयंती, भीमजयंती, आण्णा भाऊ जयंती पासून हनुमान जयंती एकत्र करण्याची परंपरा आजही जपली जाते.
या कार्यक्रमासाठी श्रीराम गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक उत्तम भिलारे, सदानंद भिलारे, प्रशांत भिलारे यांनी तसेच अध्यक्ष लखन जाधव,उपाध्यक्ष युवराज भिलारे,धीरज ओहोळ, राहुल भिलारे, अमन शेख,शुभम सकटे, पुण्यवंत कांबळे,विनोद सरवदे यांनी परिश्रम घेतले.