गणेशगांव (युगारंभ )-एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अकलूज बीट लवंग अंतर्गत मौजे गणेशगाव, नलवडे वस्ती ता. माळशिरस येथे अंगणवाडी प्रवेशोत्सव साजरा मोठ्या उत्साहात करण्यात आला.
याप्रसंगी गणेशगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभाताई नलवडे , पोलीस पाटील भाईसाब शेख , अंगणवाडी सेविका मनीषा लावंड , मदतनीस लताबाई ठोकळे , आशा सेविका दीपाली बाबर , पालक प्रतिनिधी कोमल नलवडे , पूनम गिरीमकर, हिराबाई यादव , अनिता नलवडे , रेश्मा शेख , महिला बचत गटाच्या अध्यक्षा रूपाली नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी स्त्री जन्माचे स्वागत या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
नलवडे वस्ती अंगणवाडी येथे दरमहा मुलांचे आरोग्य तपासणी तसेच कुपोषित बालकांना औषधौपचार व सकस आहार तसेच पालकांना मार्गदर्शन यासाठी सक्रिय प्रयत्न केला जात असल्याचे सेविका मनिषा लावंड यांनी सांगितले.