December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हा

‘सौंदर्य’ या निसर्गाने दिलेल्या देणगीचे जतन करण्यासाठी,सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे – स्वरूपाराणी मोहिते-पाटील 

युगारंभ/ अकलूज -सौंदर्य ही निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी असून त्याचे जतन करणे महत्त्वाचे आहे, यासाठी सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असून कोणीही घरच्या घरी इलाज न करता ही सेवा आपल्या अकलूज मध्ये डॉ.प्रफुल्ल गायकवाड यांच्या द्वारका केस व त्वचा विकार क्लिनिकमध्ये होणार असून त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वरुपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथे द्वारका केश व त्वचा विकार क्लिनिकच्या उद्घघाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून केले .

तर उद्घघाटन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. श्रीकांत एन.कुलकर्णी यांच्या हस्ते झाले,यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की,

सध्याच्या युगामध्ये आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलत असून आधुनिक चिकित्सेसोबत आयुर्वेद चिकित्सा ही महत्त्वाची असून त्याचा उपयोग त्वचा व केस यांच्या विकारावर महत्वाचा असल्याची गरज ओळखून डॉ. प्रफुल्ल गायकवाड यांनी द्वारका केश व त्वचाविकार क्लिनिक चालू केले याबद्दल त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

              सदर क्लिनिकमध्ये सोरियासिस, रुक्ष कोरडी त्वचा, निस्तेज चेहरा ,पांढरे कोड ,फुटकळ्या ,गजकर्ण, लाल चट्टे, चामखीळ ,चेहऱ्यावरील वांग, त्वचा काळवंडणे, कुष्ठरोग ,ॲलर्जी, अंगाची खाज येणे,पिंपल्स ,काळे डाग, हाता पायाला भेगा पडणे,केसांच्या तक्रारी, जळवात, फंगल इन्फेक्शन, केस गळणे ,अकाली केस पांढरे होणे,केस विरळ होणे, चाई पडणे, कोंडा होणे, केस रुक्ष होणे इ.विकारावर सदर क्लिनिकमध्ये औषधोपचार करण्यात येणार असल्याचे डॉ. प्रफुल्ल गायकवाड यांनी सांगितले.

      या वेळी डॉ.कुलकर्णी, डॉ.अक्षय वाईकर, डॉ. नागनाथ दगडे- पाटील, डॉ. अभिजीत राजे भोसले, डॉ. प्रशांत निंबाळकर, डॉ. नितीन कुबेर, डॉ. संजय वाळेकर, डॉ. दादासो काळे, डॉ.फैजल सय्यद, आनंदनगर चे माजी सरपंच वसंतराव जाधव,सदस्य राजेंद्र सोनवणे, सतिश कुंभार, रणजित जाधव, गोरख गवळी, रमजान मुलाणी,श्रीराम ॲग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. हरी हाके, यादव सर, शिंदे सर, श्रीकांत औषधी भंडारचे मालक अण्णा वैद्य , डॉ.श्रीप्रसाद चव्हाण, अंगद जगताप ,घोगरे साहेब, संजय जगदाळे, अनिल कदम,राजेंद्र जगदाळे, संजय शिंदे, समाधान वाघमारे, राजेंद्र जाधव, बच्चन साठे, अविनाश जाधव, नामदेव पवार, बाळासाहेब शिंदे, आदी उपस्थित होते.

        यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत डॉ. बाळकृष्ण गायकवाड, वसंतराव गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड, मल्लिकार्जुन गायकवाड, डॉ.पांडुरंग गायकवाड, डॉ.सौ.मीनाक्षी गायकवाड,डॉ. हर्षवर्धन गायकवाड, तहसिलदार सौ. शितल गायकवाड ऋषीकेश गायकवाड, अमरसिंह गायकवाड व द्वारकाधीश परिवारातील सदस्यांच्या वतीने करण्यात आले.

Related posts

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी सोलापूर येथे मॉलसाठी जागा व निधीही उपलब्ध करुन देवू- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील

yugarambh

वाफेगाव ता. माळशिरस येथे अनैतिक संबंधातुन महिलेचा खून

yugarambh

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ६६३ रुग्णाची मोफत नेत्र तपासणी

yugarambh

मा.धैर्यशील(भैय्यासाहेब )मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थ्यांना  स्कुल बॅग वाटपाचा विधायक उपक्रम

yugarambh

जि. प.प्रा. मुलींची आदर्श शाळा नं.१ अकलूजच्या गिरीजा टेके हिचे वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश.

yugarambh

सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग,अकलूज येथे ‘सहकार महर्षि’ यांना अभिवादन

yugarambh

Leave a Comment