December 1, 2023
yugarambh
Breaking News
राज्य

शैक्षणिक ज्ञानाबरोबर आध्यात्मिक ज्ञान गरजेचे  – प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी ह्यांचे प्रतिपादन

पुणे ४ मे (युगारंभ ) : “शैक्षणिक ज्ञानाबरोबरच आध्यात्मिक ज्ञान का गरजेचे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. तसेच स्वतः बरोबरच इतरांचेही चांगले करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे आणि समाधान, सुख हे ज्ञानाने कसे मिळविता येते हे शिकून आत्मसात केले पाहिजे” असे प्रतिपादन कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार व भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी ह्यांनी येथे केले. विद्यावाचस्पती विद्यानंद लिखित “समाधानातील सुख” ह्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले त्यादरम्यान रसिक वाचक आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या येथील पुणे केंद्रातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.

 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राचे संचालक प्रा. डॉ. गौतम बेंगाळे पुस्तक प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी समाधान व सुख या दोन्हीही गोष्टी कशा वेगळ्या आहेत या बाबत व्यक्तिगत मत व्यक्त करून सामाजिक माध्यमांचा चांगला वापर कसा करता येईल या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पुस्तकाचे लेखक विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी पुस्तकाबद्दल माहिती देताना, “समाधान हे अंतर्मनाशी व सुख हे शरीराशी निगडीत आहे; तसेच मन, तन, धन यांचा समतोल साधून असाध्य गोष्टी साध्य करता येतात” असे सांगितले व हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांनी समजून घ्यावे असे आवाहन केले.  

   समाधानातील सुख या पुस्तकाचे प्रकाशन प्रा.डॉ.मेधाताई कुलकर्णी (माजी आमदार व राष्ट्रीय उपाध्यक्षा भा.ज.प.महिला मोर्चा), प्रा.डॉ.गौतम बेंगाळे (विभागीय संचालक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नशिक विभागीय केंद्र पुणे) व श्री.दगा मोरे (विभागीय संचालक ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, कोथरूड पुणे) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यावाचस्पती विद्यानंद हे याच संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. 

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गोविंद नामदे यांनी केले व सौ. शुभांगी जंगम यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts

अकलूज उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन

yugarambh

समाजामध्ये महिलांविषयी सकारात्मक बदल घडत आहेत : शितल देवी मोहिते-पाटील

yugarambh

राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या नावावर होणार जमिन.-आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषदेत केला होता पाठपुरावा

yugarambh

सदाशिवनगरचा  विशाल बनकर जिगरबाज खेळला; पण शेवटच्या सव्वा मिनिटाने घात केला

yugarambh

‘झुंड’चा टीझर रिलीज; बिग बींच्या लूकनं वेधलं लक्ष

Admin

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचणे महत्वाचे : सहायक आयुक्त संगीता डावखर

yugarambh

Leave a Comment