अकलूज (युगारंभ )- विधान परिषदेचे आमदार मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व भारताच्या स्वातत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज सदाशिवनगर शिवामृत भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन माळशिरस तालुक्याचे आमदार मा. श्री. रामभाऊ सातपुते व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन सरचिटणीस मा. श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास माजी जि प उपाध्यक्ष श्री. बाबाराजे देशमुख, श्री शंकर सहकारी चे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी, पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती सौ. वैष्णवीदेवी मोहिते पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, RPI चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, अमृतभैय्या माने देशमुख, भाजपचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. शंकरराव भानवसे, बाळासाहेब वावरे, भीमराव काळे, गणपतराव वाघमोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, डॉ. संतोष खडतरे, श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय ( सिव्हिल हॉस्पिटल) सोलापूर येथील प्रमुख आरोग्य अधिकारी व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढी अकलूज येथील प्रमुख आरोग्य अधिकारी तसेच आजी माजी जि प सदस्य, पंचायत समिती सदस्य, शिवामृत दूध संघाचे संचालक, श्री शंकर सहकारी चे संचालक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त *प्रत्येक रक्तदात्यास विविध प्रकारच्या फळ वृक्षांच्या रोपांचे वाटप* करण्यात आले. तसेच गोरगरीब जनतेसाठी *केंद्रशानसनाच्या आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून नोंदणी करून* या कार्डचे वितरण देखील करण्यात आले या योजनेद्वारे प्रत्येक कुटुंबियांना ५ लाख रुपयांचा वार्षिक मोफत हॉस्पिटल खर्च तसेच १३९३ आजारांवरती मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे. माळशिरस तालुक्यात अशा २१०० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देखील रणजित दादांनी मिळवून दिला आहे. सदाशिवनगर ग्रामपंचायत, पुरंदावडे ग्रामपंचायत, येळीव ग्रामपंचायत, जाधववाडी ग्रामपंचायत, जिव्हाळा फाउंडेशन व श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर यांच्या वतीने आज सदाशिवनगर शिवामृत भवन येथे आयोजित केलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित् रक्तदान शिबिरात *२७५* जणांनी अनमोल असे सर्व श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान केले आणि आदरणीय दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांनी रक्तदान करून रणजित दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.