कोरोना महामारीच्या काळात अनेक माणसं हे जग सोडून गेले.दुसर्या लाटेत तर ग्रामीण भागातील अनेक लोकांचा कोरोनामुळे बळी गेलेला पहायला मिळाला.
बिजवडी ता.माळशिरस येथील प्रतिष्ठीत नागरिक, प्रगतशील शेतकरी आणि व्यावसायिक असणारे सुखदेव दत्तात्रय पवार यांचे कोरोनामुळे मागील वर्षी निधन झाले.त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रित्यर्थ दिनांक 08 मे रोजी बिजवडी पवार वस्ती येथे सकाळी 10 ते 12 वेळेत ह.भ.प.मामा महाराज काजळे यांच्या किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षी ग्रामीण भागात प्रथम पुण्यस्मरण मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. भजनाचे, कीर्तनाचे , नामसंकिर्तनाचे प्रत्येक गावातून आवाज घुमू लागले आहेत.एका एका गावात एकाच दिवशी दोन दोन -तीन किर्तन कार्यक्रम होताना दिसत आहेत.कोरोनाने गेलेल्या लोकांच्या अत्यंविधीला हजर न राहता आल्याची खंत ठेवून वर्षश्राद्ध मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. सगळीकडे त्या भयाण दिवसांची आठवण काढून हळहळ व्यक्त केली जात आहे.