लवंग (युगारंभ )-महाळुंग (पायरी पूल )ता. माळशिरस येथील ऋषिकेश किसन तनपुरे वय 18 वर्षे रा. पायरी पूल याचा अपघाती मृत्यू.
अकलूज श्रीरामपूर बस क्र -MH 14- BT 4169 टेम्भूर्णी कडे जाणाऱ्या बसने पायरी पूल स्टॉपवर ऋषिकेश यास जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शी च्या सांगण्यानुसार ऋषिकेश अकलूज च्या दिशेने HF deluxe या MH42G 285 या मोटारसायकलने निघाला असता अकलूजकडे जाणाऱ्या ओमनी गाडीला ओव्हरटेक करताना अकलूज श्रीरामपूर बस क्र -MH 14- BT 4169 बसने ऋषिकेश यास धडक दिली.
अपघातानंतर बस चालक फरार.
अकलूज पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल.अकलूज पोलीस स्टेशनला गुन्ह्यांची नोंद.