December 2, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हा

अकलूज येथे बुध्द महोत्सवाचे आयोजन

अकलूज(युगारंभ )-अकलूज येथील बुद्ध महोत्सव यंदा शनिवार दिनांक १४ मे २०२२ पासून सुरू होत असून या तीन दिवसीय महोत्सवात समाज प्रबोधनाचे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाणार आहेत अशी माहिती बुद्ध महोत्सव समितीने दिली आहे .

        शनिवारी सकाळी ठीक ९ -०० वाजता धम्म ध्वजारोहणाने या बुद्ध महोत्सवाची सुरुवात होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी ठीक ७-०० वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसाचा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे .

त्यानंतर रविवार दिनांक १५ मे २०२२ रोजी सकाळी ठीक ८-३० वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा होणार असून सकाळी ठीक १० – ०० वाजता अंधश्रद्धाविषयी जागृती करणी , चमत्कारांमागील सत्य हे प्रयोग | अंनिसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा . विनायक माळी हे सादर करणार आहेत . तर संध्याकाळी ७-०० वाजता विद्रोही कवी देवदत्त सूर्यवंशी यांच्या | काव्यवाचनाचा आणि ८-०० वाजता बोधिसत्व चॅनलचे संपादक सागर कांबळे यांचा महाराष्ट्रातील बुद्ध लेण्यांविषयीचा कार्यक्रम प्रोजेक्टर द्वारा सादर करणार आहेत .

सोमवार दि . १६ मे २०२२ रोजी म्हणजेच बुद्ध पौर्णिमा निमित्त पहाटे ५ ०० वाजता सुप्रसिद्ध आंबेडकरी गायक विजय सरतापे आणि संच यांचा बुद्ध पहाट हा कार्यक्रम आयोजित केला असून सकाळी ठीक आठ वाजता धार्मिक विधी होणार आहेत . त्यानंतर ठीक ९ -०० वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण आणि सामुहिक बुद्ध वंदना घेतली जाणार आहे . ठीक ५-०० वाजता संपूर्ण शहरातून बुद्ध प्रतिमेची | सजवलेल्या रथातून मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर रात्री ठीक ८-०० वाजता स्नेहभोजनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे .

सदर कार्यक्रम पारनेर येथील भंतेजींच्या नेतृत्वाखाली केले जाणार आहेत . सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्ध महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत

Related posts

वृषाली सरवळे यांचा जिल्हाधिकारी यांच्याहस्ते सन्मान.

yugarambh

जिजामाता कन्या प्रशालेत महिला दिन उत्साहात साजरा

yugarambh

वाफेगाव ता. माळशिरस येथे अनैतिक संबंधातुन महिलेचा खून

yugarambh

विधान परिषदेचे आमदार मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील* यांच्या *वाढदिवसानिमित्त*व भारताच्या स्वातत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

yugarambh

माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील गावांची नावे जाहीर झाली…

yugarambh

गृहविज्ञान महिला महाविद्यालयात “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा

yugarambh

Leave a Comment