अकलूज (युगारंभ )-महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमा नुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नामनियुक्ती केली आहे.
आ.रणजितसिंह मोहित पाटील यांच्या सारखा शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू आमदाराची पुणे विद्यापीठांच्या अधिसभेवर नियुक्ती झाल्याने त्यांच्या अनुभवाचा व अभ्यासाचा फायदा विद्यापीठाला नक्कीच होईल म्हणून शिक्षण क्षेत्रील जाणकार व तज्ञ मंडळी यांच्या कडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे, १३ मे २०२६ पर्यंत मोहिते पाटील यांच्या विद्यापीठ अधिसभा सदस्यत्वांची मुदत असणार आहे.
दर्जेदार उच्च शिक्षण देणाऱ्या सोलापूर व पुणे जिल्ह्यात शिक्षण संस्था मोहिते-पाटील यांच्या असून त्या माध्यमातून हाजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची शिक्षण क्षेत्रातील तज्ञ आमदार म्हणून देशातील नामवंत असे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड झाल्याने दादांचे चे अभिनंदन