December 1, 2023
yugarambh
Breaking News
राज्य

आमिष दाखवले लग्नाचे, केला अत्याचार ;माळीनगरच्या आरोपीला मिळाला पोलिसांचा पाहुणचार

माळीनगर (युगारंभ ) -माळीनगर ता. माळशिरस येथील आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

यातील आरोपी अब्दुलरजाक सलीम शेख रा. दत्तचाळ माळीनगर तालुका- माळशिरस येथे राहणारा आहे.याने डिसेंबर 2019 मध्ये (नक्की तारीख आठवत नाही) ते जुन 2021 मध्ये (नक्की तारीख आठवत नाही)  च्या दरम्यान आरोपीचे राहते घरी म्हणजेच दत्तचाळ, माळीनगर ता. माळशिरस येथे यातील पिडीत मुलगी निर्भया (बदललेले नांव) हिला बोलावून घेऊन अत्याचार केले आहेत.

  आरोपी हा पीडित मुलीस “माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, तुझे वय पुर्ण झालेनंतर आपण दोघेजण लग्न करु,” असे म्हणून अकलूज येथे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जाऊन, लग्नाचे अमिष दाखवून, पिडीत मुलीचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून,वारंवार शरीर संबंध केले आहेत.

यात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार

मुलगी निर्भया (बदलेले नाव) हिला मासिक पाळीचा त्रास होऊन अंगावरील वारंवार जात असल्याने 28/04/2022 रोजी संग्रामनगर येथील खाजगी दवाखान्यात तपासणीसाठी नंबर नोंदविला त्यानंतर 29/04/2022 रोजी सकाळी 11:30वा सुमारास निर्भया (बदललेले नांव), भाची असे हस्पीटलमध्ये आलो होतो. त्यावेळी तेथे सोनोग्राफी केलेनंतर आम्हाला डॉक्टरांनी, मुलीस गर्भधारणेची लक्षणे असताना तिने वारंवार औषध गोळ्या खाल्याने तिचे पिशवीवर सुज येवून तिला अंगावरील जाण्याचा त्रास होत आहे असे असून योग्य औषधउपचार करावे लागतील असे सांगितले.

  • वय पूर्ण झाल्यावर लग्न करू-

त्यानंतर आम्ही डॉक्टरांनी दिलेले औषध गोळ्या घेवून घरी गेलेनंतर मुलगी निर्भया (बदललेले नांव) हिला अधिक विश्वासात घेवून तिच्याकडे विचारपूस केली तेव्हा तिने मला सांगितले की, सलीम शेख यांचा मुलगा अब्दुलरजाक सलीम शेख हा मी दहावीमध्ये असताना माझेशी बोलत होता. त्यानंतर त्याने माझेशी गोड बोलून जवळीक साधून मैत्री संपादन केली होती. आमची दोघाची मैत्री झाल्याने अधुन मधून आम्ही एकमेकांना फोनवर बोलत होतो. तेव्हा तो मला, तु मला खुप आवडते, माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, तुझे वय पुर्ण झालेनंतर आपण दोघेजण लग्न करु असे म्हणत होता.

डिसेंबर 2019 मध्ये (नक्की तारीख आठवत नाही) अब्दुलरजाक शेख याने त्याचा मोबाईल नंबर वरुन माझा मोबाईल नंबर वर फोनकरुन, तु माझे रुमवर ये, तुझेकडे काम आहे असे म्हणाल्याने मी त्याचेकडे गेले त्यावेळी त्याने मला, शरीर सुखाची मागणी केली परंतु मी माझे वय पुर्ण नाही, बघू असे म्हणाले होते तरीही त्याने माझ्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध केले.

  • फोटो व्हायरल करण्याची धमकी

त्यानंतर सन 2020 मध्ये त्याने मला आनंदी गणेश मंदीर, शिवपार्वती मंदीर व इतर ठिकाणी घेऊन जाऊन त्याने माझे इच्छेविरुध्द जबरदस्तीनं त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढले .सन 2020 मध्ये त्याने मला, तुझे काढलेले फोटो तुझे घरच्यांना दाखविन, सोशल मिडीयावर व्हायरल करीन अशी धमकी देवून त्याचे रुमवर बोलावून घेवून सात-आठ वेळा माझे इच्छेविरुध्द शरीर संबंध केलेले आहेत.

  • आरोपीचे लग्न झालेले…

एप्रिल 2021 मध्ये अब्दुलरजाक शेख याचे लग्न झाले असल्याचे मला समजल्याने मी त्यास, तु माझे सोबत लग्न करणार होता मग तु दुस-या मुलीशी लग्र कसे केले असे विचारले तेव्हा त्याने मला, माझे आई वडीलांनी सांगितल्यामुळे मी लम्र केल आहे असे म्हणाला. त्यानंतर मी त्याचे सोबत बोलण बंद केले होते. जुन 2021 मध्ये (नक्की तारीख आठवत नाही) परत अब्दुलरजाक शेख याने त्याचे रुमवर ये असे म्हणून माझे मोबाईलवर मेसेज केला होता. त्याचे भितीमुळे मी रुमवर गेले होते तेव्हा त्यास मी, तुझे लग्न झालेले आहे, तु माझेशी बोलू नकोस असे म्हणाले पण तरीही त्याने मला, फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून माझे इच्छेविरुध्द जबरदस्तीने शरीर संबंध केला आहे असे मला सांगितले. म्हणून निर्भया (बदललेले नांव) हिला लग्नाचे -अमिष दाखवून फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून तिचे इच्छेविरुध्द वारंवार शरीर संबंध करणारा अब्दुलरजाक सलीम शेख रा. दत्तचाळ माळीनगर ता. माळशिरस याचेविरुध्द तक्रार आहे.

  • गुन्हा दाखल व अटक

म्हणून वगैरेे वरील मजकुरच्या फिर्यादी जबाबावरून आरोपी विरूद्ध अकलूज पोलीस ठाणे गु. र. नं. 343/2022 भा.द.वि.सं.क. 376, 506, सह लैंगिक अत्याचारापासून बालकाचा संरक्षण अधिनियम कलम 4, 5(एल), 8, 12, 42 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.

असून पुढील तपास एस. डी. कांबळे म.पो.स.ई. अकलूज पोलीस ठाणे या करीत आहेत.

Related posts

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

yugarambh

अकलूज उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन

yugarambh

प्रहारचे आमदार बच्चू कडूंना दोन वर्षाची शिक्षा

yugarambh

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिलेबी वाटप

yugarambh

पुष्प 3रे -संसारा आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे – ह.भ.प. राहुल महाराज चोरमले

yugarambh

वीज वितरणचे कर्मचारी उद्यापासून संपावर पण,वीजपुरवठा खंडित होणार नाही

yugarambh

Leave a Comment