माळीनगर (युगारंभ )-पारधी समाजाचा व गून्हेगारीचा संबध नेहमीच जाेडला जाताे परंतू गेल्या दशकातून शासन व न्यायप्रणाली यंत्रणेस असे निर्दशनास आले आहे की, या पारधी समाजात अनेक लाेक महीला -पूरूष व यूवा वर्ग हा मेहनती आहे कष्ट करून जगणारा आहे . या कष्टकरी वर्गाला जर उदयाेग व्यवसायाची जाेड दिली तर यांच्या जीवनाचे परीवर्तन तर हाेईलच परंतू येणारी पिढीही गून्हेगारी मूक्त हाेवून समाजाच्या मूख्य प्रवाहात जाेडली जाईल.
परंतू हे परीवर्तन घडणार कसे पाेलीस यंत्रणा आणि शासन स्तरावरून वरीष्ठ अधिकारी वर्गानी व मा.पाेलीस अधिक्षक तेजस्वी सातपूते यांच्या संकल्पना व प्रेरणेतून पाेलीस परीवार यासारखी सामाजीक परीवर्तन करणारी एनजीअेा मदतीला घेवून त्यांच्या सहकार्याने व माध्यमातून महीलांना गृहद्योग प्रशिक्षण व माहीती देण्यासाठी मदतीला घेवून भरीव सहकार्य करण्याचे ठाम मनावर घेतलेले आहे.
त्यानूसार आज दिनांक ११।५।२०२२ राेजी सायंकाळी ०६।०० वा सवतगव्हाण येथील पारधी कॅम्प मध्ये अकलूज विभागाचे उपविभागीय पाेलीस अधिकारी डाॅ. बस्वराज शिवपूजे खास उपस्थित हाेते.
यावेळी पारधी समाजाच्या जीवनाचा चेहरामाेहरा लवकरच बदलला जाईल व चांगले, ईमानदारीने, सचाेटीने काम केल्यास उज्वल भवितव्य निर्माण हाेईल असे प्रतिपादन डाँ शिवपूजे यांनी केले.
यावेळी अकलूज पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक अरूण सूगावकर व समन्वयक अकलूज पाेलीस स्टेशन व ग्रामसूरक्षा दल व पाेलीस परीवार प्रमूख पाेलीस हवालदार रमेश सूरवसे पाटील, पाेलीस हवालदार अभिजीत कूभांर व पाेलीस हवालदार विशाल घाटगे व मान्यवर पाे.पाटील शंकर पाटील यांचेसह २० ते २५ पारधी महीला व २५ ते ३० पारधी पूरूष उपस्थित हाेते.
महाराष्ट्र पाेलीस दलातून साेलापूर पाेलीसाची ही कामगिरी गून्हेगारीस प्रतिबंध करणारी निश्चित मानली जाईल यात नवल काय ?