December 1, 2023
yugarambh
Breaking News
राज्य

पुरूष वंध्यत्व अन् आयुर्वेद-डॉ.हर्षवर्धन गायकवाड

अकलूज (युगारंभ )-स्वता: सारखाच दुसरा सजीव निर्माण करणे हे सजीवाची जी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्यातले एक महत्वाचे वैशिष्ट्ये आहे, यालाच आपण प्रजोत्पादन असे म्हणतो. प्रजोत्पादनाची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याला जननक्षम असे म्हणतात. ज्याच्यामध्ये प्रजोत्पादनाची क्षमता अजिबात नाही त्याला वंध्यत्व असे म्हणतात.

  सध्याची परिस्थिती लक्षात घेता पुरूष वंध्यत्वाचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे कामाचा ताणतणाव, धावपळ, अनियमित झोप, व्यायामाचा अभाव, पौष्टिक पदार्थांचा खाण्यामध्ये अभाव, वाढती व्यसनाधीनता, तरुणपणातील चुकीच्या सवयी, या सर्वांचा शुक्र चातुनिर्मिती व वर्धनावर दुष्परिणाम होत असतो व परिणामस्वरूप पुरूषाला वंध्यत्वाला सामोरे जावे लागते.

 • फक्त स्त्रीलाच वांझपणा असतो असे नाही तर हा दोष पुरूषामध्ये सुद्धा असू शकतो. हा दोष वीर्याची तपासणी करून समजतो. 10 टक्के पुरूष हे प्रजननास पूर्णत: असमर्थ असतात. लग्न झालेल्या 100 पुरूषांमध्ये एक व्यक्ती पूर्णत: प्रजननास असमर्थ असलेली आढळून येते.

  कारणे :-
  1) पुरूष वंध्यत्वाचे प्रमुख कारण म्हणजे पुबीज किंवा शुक्रधातुची निर्मिती न होणे किंवा कमी प्रमाणात होणे.
  * शुक्रजंतू अजिबात तयार होत नाहीत. त्या अवस्थेस एझोस्पर्मिया (Azoospermia) असे म्हणतात.
  * जर ते कमी प्रमाणात तयार होत असतील तर त्या अवस्थेला ऑलिगोस्पर्मिया (Oligospermia) असे म्हणतात. याची कारणे खालीलप्रमाणे –
  – अंडकोष वृषणात फार उशिरा उतरणे किंवा अजिबात न उतरणे.
  – अंडाशयाची वाढ स्वाभाविक प्रमाणात न होणे.
  – अपघात शस्त्रक्रिया किंवा क्ष-किरणांच्या उत्सर्जनामुळे अंडकोषाला इजा पोहचणे.
  – घट्ट वस्त्रांचा वापर केल्यास तेथील उष्णता वाढल्याने तसेच अतिकडक पाण्याचा शेक घेतल्याने देखील तापमानाचा अंडकोषावर परिणाम होतो.
  – इतर शारीरिक व मानसिक तक्रारी.
  – वय, वयाच्या 40 वर्षानंतर पुरूषांची जननक्षमता कमी होत जाते.
  2) दोन्ही वीर्यवाहक नलिका, शुक्रनलिका यामध्ये अडथळा असल्यामुळे
  3) जन्मजात वैगुण्य – जन्मजात वीर्यवाहक नलिका नसल्यामुळे तसेच जन्मत:च वीर्यवाहक नलिकेमध्ये अडथळा असल्यास
  4) प्रजोत्पदनास असमर्थ असल्यामुळे (Impotance) वेळेपूर्वीच वीर्यपतन होणे.
  5) फायमोसिस सारखे शिश्नातील दोष असल्यास
  6) संभोगाच्यावेळी एकदम कमी वीर्य बाहेर पडत असल्यास
  7) वीर्याचे घटक रासायनिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्यासल अस्वाभाविक असल्यास.
  8) शीघ्रपतन, स्वप्नदोष, लघवीतून धातू जाणे, वीर्य पातळ होणे असे दोष आढळल्यास पुरूष वंध्यत्व होण्याचा धोका असतो.

आयुर्वेदिक चिकित्सा :-

1) पुरूष वंध्यत्वासाठी चिकित्सा करताना नेमके निदान करून त्यानुरूप चिकित्साक्रम हा निश्चित करावा लागतो.
2) सर्वप्रथम आयुर्वेदामध्ये जी प्राकृत शुक्राची लक्षणे वर्णन केलेली आहेत, त्याकरिता शुक्रातील दोष घालवून प्राकृत शुक्र निर्मिती करण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
3) गर्भधारणेची पहिली पायरी म्हणजे शरीरशुध्दी त्यामुळे पंचकर्म उपचार हे खूप फलदायी ठरतात.
4) बिघडलेली दिनचर्या, ऋतुचर्या, आहार, विहार, निद्रा व्यवस्थिती केली पाहिजे.
5) यामध्ये शिरोधारा, वमन, विरेचन, बस्ति, उत्तरबस्ति यासारखे उपचार घेतल्याने शरीरशुद्धी तर होतेच त्याचबरोबर बीजशुद्धी होऊन नितळ कांतीचा लाभ होतो, सर्व इंद्रियांची शक्ती वाढते, मन प्रसन्न राहते, तसेच स्त्री-पुरूषांमधील आकर्षणही वाढते.
6) शुक्रधातू संवर्धनासाठी आहारामध्ये दूध, लोणी, खडीसाखर, तूप, काळे मनुके, खारीक, अंजीर, बदाम अशा सात्विक द्रव्यांचा समावेश करावा.
7) दुधाचा जास्तीत जास्त वापर करावा कारण दूध हे वल्य, वृष्य असून श्रेष्ठतम रसायन व वाजीकरण द्रव्य आहे.
8) रोज आदल्या दिवशी पाण्यात भिजवलेले 4-5 बदाम सोलून सकाळी खावेत, त्याचबरोबर पंचामृत (साखर, मध, दही, तूप, दूध एकत्र करुन) चिमुटभर केशराची पूड एकत्र करून सकाळी नाश्ता करण्यापूर्वी घ्यावे.
9) तसेच वानरीकल्प, पुष्पधन्वा वटी, वृष्यवटी, कवचबीज, मुसळी चूर्ण, शतावरी कल्प अशा प्रकारचे आयुर्वेदात सांगितलेले योग व कल्पांचा योग्य स्थिती पाहून वापर केल्याने वंध्यत्वासारख्या गंभीर दोषावर विजय प्राप्त करता येतो.
10) संबंधित रूग्णांनी तज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊनच औषधोपचार सुरू करावा.

– डॉ.हर्षवर्धन वसंतराव गायकवाड
(एम.डी.आयु.)
मो.नं.9970611617 / 8459026029
द्वारका आयुर्वेदिक हॉस्पिटल व केरळीय पंचकर्म केंद्र
शाखा – पुणे, कोथरूड व अकलूज

Related posts

समाजामध्ये महिलांविषयी सकारात्मक बदल घडत आहेत : शितल देवी मोहिते-पाटील

yugarambh

उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे महाराष्ट्रातील धनगर समाजासाठी गाऱ्हाणे

yugarambh

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांचेकडून दुर्गसंवर्धन व दुर्गदर्शन मोहीमेचे आयोजन…

yugarambh

प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

yugarambh

तुका म्हणे त्यांचे केले आम्हां वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत:- ह.भ.प.अभिजित महाराज कुरळे

yugarambh

मंत्री  सावंत यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार गणेश जाधव यांचे मेल द्वारे निवेदन.

yugarambh

Leave a Comment