December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हा

छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त युवा सेनेचे रक्तदान शिबिर

संगम (युगारंभ )-छत्रपती संभाजी राजे शिवाजीराजे भोसले यांची जयंती समाज कार्यातून संगम येथे साजरी करण्यात आली.युवा सेना सचिव वरून सरदेसाई विभागीय सचिव अक्षय ढोबळे युवा सेना राज्य विस्तारक उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

  माळशिरस तालुक्यातील संगम हे गाव नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असते. शिबिराचे आयोजन युवा सेना माळशिरस तालुका प्रमुख गणेश इंगळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून संगम तालुका माळशिरस येथे करण्यात आले. यामध्ये तब्बल ६२ युवा सैनिक व शिवसैनिक यांनी रक्तदान केले .यामध्ये महिलांचाही उस्फुर्त सहभाग होता. आपण समाजाचे काही देणे लागतो याचे भान ठेवून हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या शिकवणीनुसार युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर घेतले .

      रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख आशाताई टोणपे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी दीप प्रज्वलन युवासेना उपजिल्हाप्रमुख विक्रम उर्फ सोनू पराडे पाटील युवा सेना अकलूज शहर प्रमुख शेखर खिलारे शिवसेना महिला आघाडी टेंभुर्णी शहर प्रमुख अर्चना गाडेकर संगम गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पराडे संगमचे माजी सरपंच रमेश इंगळे संगमचे सोसायटीचे माजी चेअरमन आगवतराव पराडे दत्ताभाऊ साळुंखे गणेश भिताडे मिलिंद मोरे कल्याण इंगळे नरा इंगळे नाना पराडे जय पराडे यांच्या हस्ते करण्यात आले .

   या रक्तदान शिबिरामध्ये मैना पराडे, कावेरी पराडे, जयश्री इंगळे,रुपाली पराडे, रंजना इंगळे,श्रद्धा भोई या महिलांनी उस्फूर्तपणे जीवनातील पहिल्यांदा रक्तदान केले.

    यावेळी बबलू इंगळे ओम पराडे विकास भोई युवराज पवार सचिन ताटे हनुमंत गायकवाड सुनील पराडे शरद इंगळे दयानंद इंगळे विकी पराडे रोशन पराडे अक्षय पराडे नवनाथ इंगळे अविनाश भोई माधव पराडे नागेश इंगळे सागर इंगळे शिवाजी पराडे शुभम ताटे शरद भोई सचिन इंगळे रमेश काकडे सागर साळुंखे लक्ष्मण इंगळे मल्हार इंगळे कल्याण पराडे शुभम इंगळे तात्या पराडे माऊली पराडे मज्जिद मुलानी समीर मुलानी बापू मोहिते राम ढेंबरे सोमा गायकवाड़ आदित्य इंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी६२ युवा सैनिकांनी शिवसैनिकांनी रक्तदान केल्याबद्दल व सिद्धेश्वर ब्लड सेंटर सोलापूर ब्लड बँकेचे डॉक्टर कर्मचारी यांचे विशेष आभार युवासेना माळशिरस तालुकाप्रमुख गणेश इंगळे यांनी मानले

Related posts

भिमजयंती मोठया उत्साहाने लवंग (भिलारे वस्ती )येथे साजरी

yugarambh

जन संजीवनी अभियान मध्ये सोलापूर जिल्ह्यात यशवंतनगर प्रा आरोग्य केंद्र प्रथम तर माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्यात प्रथम

yugarambh

गृहविज्ञान महिला महाविद्यालयात “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा

yugarambh

मुलींनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनले पाहिजे – स्वरूपाराणी मोहिते-पाटील

yugarambh

बहुजन पत्रकार संघ व रोखठोक न्यूजच्या वतीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांना समाजभूषण पुरस्कार

yugarambh

नॅक कमिटीची अकलूजच्या गृहविज्ञान महिला महाविद्यालयास भेट.

yugarambh

Leave a Comment