युगारंभ (अकलूज )-दि.28 मे 2022 रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्यावतीने डॉ.सॅम्युअल हॅनिमन क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजय तायडे होते .
स्पर्धेसाठी राज्यभरातून 15 क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर
महिलांच्या क्रिकेट संघाने भाग घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अजय तायडे यांनी ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रिकेट स्पर्धेचे योग्य व नेटके नियोजन केल्याबद्दल स्पर्धकांचे कौतुक करत क्रीडा समितीचे सर्वस्वी डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांचे अभिनंदन करत जिल्हा संघटनेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.एम.के.इनामदार, डॉ.राजीव राणे, डॉ.टी.आर. कदम डॉ. सौ सुनेत्रा जोशी, डॉ.अंजली कदम डॉ. प्रविण पाटील,डॉ.नितीन एकतपुरे,डॉ. रामचंद्र मोहिते, डॉ.संजय गायकवाड ,डॉ. मोहन वाघमोडे डॉ.अरुण बंडगर,डॉ. संगीता पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ.तुषार माने, बाळासाहेब सरगर इ.नी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली .
संघटनेचे सचिव डॉ.संजय देशमुख,सदस्य डॉ. शिवाजीराव काळे, डॉ. योगेश घोगरे पाटील, डॉ. संगिता पाटील, रमेश सिद, डॉ.पृथ्वीराज माने पाटील, तालुकाध्यक्ष डॉ अभिजीत राजे भोसले, डॉ. ज्ञानेश्वर पवार, डॉ. तुषार जगताप ,डॉ. तुकाराम गावडे ,डॉ.सुधाकर कांबळे, डॉ. अमोल भगत ,डॉ.सुनिल गांधी, डॉ. अभिजित डोके पाटील, डॉ. निखिल गांधी, डॉ. सिद्धराज कदम, डॉ. मिलिंद हिंगमिरे, डॉ. विकास स्वामी, डॉ.किरण बोधले महाराज, डॉ.उदयसिंह जाधव,डॉ. संग्राम कीलमिसे यांची प्रमुख उपस्थिती होती..
यावेळी दि 29 रोजी पारितोषिक वितरण समारंभ माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.रामभाऊ सातपुते व अकलूजचे डी.वाय.एस.पी.डाॅ.बसवराज शिवपुजे यांच्या हस्ते संपन्न…
सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना आयोजित होमिओपॅथिचे जनक डॉ.सॅम्युअल हॅनिमन क्रिकेटच्या चषकाचे मानकरी ठरले पुण्याचे रिव्हाइव होमिओ केअर संघ, उपविजेता ठरला फिनिक्स सोलापूर वॉरियर तर तिसऱ्या क्रमांकावर बारामती तालुका होमिओपॅथीक संघटनेचा संघ जिंकला तर महिलांमध्ये विजेता ठरला माळशिरस तालुक्याचा डॉक्टर संघ उपविजेता ठरला पंढरपूर तालुक्याचा होमिओपॅथी डॉक्टरांचा संघ..
यामध्ये माळशिरस (कर्णधार डॉ.अनिल बळते), पुणे( कर्णधार डॉ. निरंजन रेवडकर),सोलापूर (कर्णधार डॉ. विकास स्वामी), सांगोला (कर्णधार डॉ. बालाजी धायगुडे),माढा( कर्णधार डॉ.विनायक गंभीरे), फलटण(कर्णधार डॉ. महेंद्र ननावरे), बारामती( कर्णधार डॉ.सचिन लोणकर) पंढरपूर (कर्णधार डॉ.अतिष खुडे )
माळशिरस महिला (कर्णधार डॉ. सपना गांधी) पंढरपूर महिला (कर्णधार डॉ. संगीता पाटील) या संघांनी भाग घेतला होता.
उपांत्य फेरीत पुरुषांच्या गटांमध्ये सांगोला व सोलापूर आमनेसामने आले होते, यामध्ये सोलापूर संघाने सामना जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला, दुसऱ्या गटामधून बारामती व पुणेचा संघ सेमीफायनल मध्ये आले होते यामध्ये पुण्याच्या संघाने फायनलमध्ये प्रवेश केला व फायनल मध्ये पुणे व सोलापूर हे संघ आमनेसामने आले होते यामध्ये पुण्याच्या संघाने पहिला क्रमांक पटकावला.
मालिकेमध्ये डॉ. अविनाश गावडे (मॅन ऑफ द सिरीज),डॉ.प्रणव भाटकर (मॅन ऑफ द मॅच),डॉ. शकील पठाण( बेस्ट फिल्डर), डॉ.अजित पवार (बेस्ट कॅच ),डॉ.कन्हैया (बेस्ट बॉलर) महिलांच्या संघामध्ये डॉ. स्वाती शेंडगे( मॅन ऑफ द सिरीज), डॉ.छायाताई दगडे ( मॅन ऑफ द मॅच), डॉ.स्वाती निंबाळकर (बेस्ट बाॅलर),डॉ. संगीता पाटील (बेस्ट फिल्डर ) यांनी बहुमान पटकावला.
अंतिम सामन्याचा शुभारंभ अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभासाठी माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते व डीवायएसपी डॉक.बसवराज शिवपुजे यांच्या हस्ते सर्व विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
कै.शरद बा.वरळे माझी उपजिल्हाधिकारी यांच्या स्मरणार्थ डॉ.सुनिल वरळे यांच्या वतीने बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन ही बक्षिसे देण्यात आली.
यावेळी माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निनाद पाटील ,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय देशमुख ,माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सतीश पालकर, आनंदनगरचे उपसरपंच वसंतराव गायकवाड, , संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.बाळकृष्ण गायकवाड, सचिव डॉ.संजय देशमुख, सदस्य रमेश सिद, डॉ.शहाजी डोंगरे, डॉ. शिवाजीराव काळे, डॉ.योगेश घोगरे पाटील,डॉ.सौ. संगीता पाटील, डॉ.पृथ्वीराज माने पाटील, तालुकाध्यक्ष डॉ अभिजीत राजेभोसले उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा समितीचे डॉ.अनील बळते,डॉ. नितीन कुबेर, डॉ. हर्षवर्धन गायकवाड, डॉ.नागनाथ दगडे,डॉ. अक्षय वाईकर,डॉ.मिलिंद हिंगमिरे, डॉ.सपना गांधी, डॉ.फैज सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले..