माळीनगर (युगारंभ )-वाघोली विकास सेवा सोसायटी वाघोली या सहकारी विकास सेवा सोसायटी ची 1 कोटी 69 लाख रुपयांची 100 % कर्ज वसूली झाली.
सदर वसुली केल्याबद्दल वाघोली ग्रामस्थ श्रीकांत मिसाळ,जिवाजी मिसाळ, पोलीस पाटील प्रदिप मिसाळ यांच्या वतीने बँक इन्स्पेक्टर रविंद्र इनामदार, वाघोली बँकेचे बँक मॅनेजर भोळे साहेब ,शिंदे काका, संस्थेचे सचिव जाधव,चेअरमन अनंता मिसाळ यांचा सन्मान शाल श्रीफळ व मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला
या कार्यक्रम प्रसंगी विष्णू मिसाळ, वसंत मिसाळ,प्रतीक पाटील, रेवन पवार, मल्हारी जाधव, सतीश मिसाळ,
सोमनाथ गाडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.