अकलूज (युगारंभ )-348 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा पुर्नस्थापना सोहळा व पुष्पहार अर्पण सोहळा माजी उपमुख्यमंत्री मा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सह्याद्रीचे अबोल कडे ज्या युग पुरुषाच्या इतिहासाचे पोवाडे गातात ज्या युगप्रवर्तकाच्या नैतिकतेला तलवारीची धार होती…त्या विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवचरीत्राचे धगधगते यज्ञकुंड पेटवून माळशिरस तालुक्यातील जनतेच्या मनात शिस्त, नियोजन व राष्ट्रप्रेम रुजवण्यासाठी व नविन पिढ्यांना देशभक्तीची प्रेरणा देण्यासाठी 348 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा पुर्नस्थापना सोहळा
दिनांक 6 जुन 2022 सांयकाळी 6.30 शिवपर्वती मंदिर शंकरनगर ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.