December 8, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हा

युवा सेनेच्या वतीने संगम येथे महाराजस्व अभियान अंतर्गत सरकार तुमच्या दारी अभियान राबविण्यात आले

संगम (युगारंभ )-युवा सेनेच्या वतीने संगम येथे महाराजस्व अभियान अंतर्गत सरकार तुमच्या दारी  या कार्यक्रमाचे उद्धघाटन शिवसेना सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा शिवाजी सावंतसर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माळशिरस तालुक्याचे जनतेचे आमदार उत्तम जानकर,माणसातील देव माणूस सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ एम के इनामदार सर,शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, शिवसेना नेतेसंजय कोकाटे,माढा लोकसभा युवासेना संपर्कप्रमुख नगरसेवक उत्तम आयवळे, आशाताई टोणपे, मीनाक्षी जगदाळे, अशोक भाऊ घोंगडे,  महावीर नाना देशमुख, स्वप्निल वाघमारे,सोनू पराडे,अवधूत कुलकर्णी,महादेव बंडगर अमोल उराडे,बबन बापू केचे, भूषण पराडे, संदेश सोनार, समीर शेख शासकीय कर्मचारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

   यावेळी माळशिरस तालुक्याचे जनतेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जानकर साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले की अशा पध्दतीचे कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात होणे आवश्यक आहे.तसेच प्रा शिवाजी सावंत सरांनी युवासेना तालुका अध्यक्ष गणेश इंगळे हे करत असलेल्या 100% समाजकारणाचे मनभरून कौतुक करून गणेश इंगळे यांना आश्वासित केले तु असेच काम करत रहा जिथे गरज भासेल तिथे नुसती हाक मार आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तिथे उपस्थित असू.

तसेच या कार्यक्रमात माणसातील देवमाणूस डॉ एम के इनामदार सर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना गणेश इंगळेचे मनापासून कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचे नेते संजय बाबा कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गणेश इंगळे व सोनू पराडे यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले आज खेड्यातील गरीब गरजू लोकांसाठी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या सवलती जनतेपर्यंत पोहोचत नाहीत आज गणेश इंगळे व विक्रम पराडे यांनी राबवलेल्या या अभियानांतर्गत इथल्या गोरगरीब कष्टकरी जनतेला मोठ्या प्रमाणात या अभियानाचा फायदा होणार आहे.

तसेच यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष मीनाक्षी ताई जगदाळे बोलताना म्हणाल्या समाजातील विविध राजकीय संघटना पक्ष वेगवेगळे कार्यक्रम सतत राबवत असतात परंतु आपल्या पंचक्रोशीतील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील नागरिकांना विविध कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तालुक्याच्या ठिकाणी फेऱ्या माराव्या लागतात हीच समस्या लक्षात घेऊन आज या ठिकाणी गणेश इंगळे व सोनू पराडे यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमास इतर राजकीय मतभेद बाजूला ठेवून सामाजिक उपक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवला पाणीपुरवठा वीज रस्ते अपघात व अन्याय ग्रस्तांना मदत अनाथ मुलांना मदत रक्तदान शिबिरे असे अनेक सामाजिक कार्य सातत्याने गणेश इंगळे हे करत असतात गणेश इंगळे यांच्या रूपाने माळशिरस तालुक्यातील पूर्व भागाला एक तरुण युवक भेटला आहे त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

 यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील वाघमारे महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख आशाताई टोणपे शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख अशोक भाऊ घोंगडे महादेव बंडगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले

            याकार्यक्रमाला संगम,गणेशगांव, बाभुळगांव या गावातील बर्याच कष्टकरी, शेत मजूरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.रेशनकार्ड विभक्त करणे, नाव कमी करणे, उत्पन्नाचे दाखले, पँनकार्ड काढणे,श्रावणबाळ योजनेत नाव नोंदवणे संजय गांधी निराधार योजना अशा अनेक सरकारी योंजनामध्ये नावे नोंदवण्यात आली.

आभार प्रदर्शन शिवसेना प्रसिद्धीप्रमुख अवधूत कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम संगम गावातील युवा सेनेचे व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हा पार पाडला

Related posts

श्री.जयसिंह मोहिते-पाटील प्राथमिक शाळा संग्रामनगरमध्ये दहीहंडी व हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन

yugarambh

माळशिरस तालुका व अकलूज परिसर फोटो ग्राफर संघटनेचा स्नेह मेळावा 2023 संपन्न

yugarambh

गणेशगाव, नलवडे वस्ती येथे अंगणवाडी प्रवेशोत्सव साजरा

yugarambh

राजकारणाला सामाजिक कार्याची जोड देणारे लढवय्ये नेतृत्व -धैर्यशील (भैय्यासाहेब )मोहिते पाटील.

yugarambh

सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग,अकलूजमध्ये नवीन विदयार्थ्यांचे स्वागत..

yugarambh

“श्री यमाईदेवी माता प्रतिष्ठान” यांनी जपली सामाजिक बांधिलकी

yugarambh

Leave a Comment