December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हा

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हालगीनादसह बोंबाबोंब आंदोलन

युगारंभ (अकलूज ):-पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील विविध मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले व सोलापूर शहराध्यक्ष अमित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय सोलापुर समोर हालगीनादसह बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

मंगळवार ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या हालगीनादसह बोंबाबोंब आंदोलनामध्ये बोलताना सोमनाथ भोसले म्हणाले की माळशिरस तालुक्यातील पाच मागण्यांसाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे त्यापैकी

  • अकलुज नगरपरिषद अंतर्गत असणारे रस्ते पाणी गटर सार्वजनिक शौचालये कचरा दिवाबत्ती या सुविधा नागरिकांना मिळत नाहीत,
  • अकलूज येथील अकलुज क्रिटीकल केअर ऍण्ड ट्रॉमा सेंटर या हॉस्पिटलची आरोग्य विभागाच्या उच्च अधिकार समितीमार्फत सखोल चौकशी होऊन संबंधित सर्व डॉक्टरांच्या पदव्या रद्द कराव्यात,
  • अकलूज परिसर व माळशिरस तालुक्यातील खराब झालेले डांबरी रस्ते त्वरित नव्याने बांधून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा,
  • प्राथमिक आरोग्य केंद्र पिलिव येथील वैद्यकीय अधिकारी माने देशमुख व जाधव यांना सेवेतून बडतर्फ करून त्या ठिकाणी नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी,
  • पदाचा गैरवापर करून आदेश काढणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी,
  • स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अकलूज येथील बँक कर्मचारी व गार्ड यांच्यावर कडक कायदेशीर दंडात्मक कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे.

सदर आंदोलनानंतर पाच सदस्यीय शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना पाच मागण्यांचे निवेदन देऊन लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली अन्यथा पुढील आंदोलन संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या घरासमोर करण्याचा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी दिला.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सोलापूर शहराध्यक्ष अमित कांबळे शहर कार्याध्यक्ष अनिल सोनकांबळे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चलवादी सोलापूर शहर संपर्कप्रमुख शरणू हजारे युवक जिल्हा कार्याध्यक्ष लखन कोरे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष हेमंत कांबळे तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका संघटक पांडुरंग चव्हाण तालुका उपाध्यक्ष शरद साठे माळशिरस तालुका संपर्कप्रमुख शिवम गायकवाड अकलूज शहर संपर्क प्रमुख शिवाजी खडतरे आकाश गायकवाड राजू बागवान जावेद बानकरी अशोक कोळी शहाजी खडतरे ऋतुराज थोरात पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन जाधव तालुका सरचिटणीस गणेश गायकवाड अक्कलकोट तालुकाध्यक्ष बाळासाहेब खैराटकर अभिषेक शिंदे राहुल चव्हाण रवी कोळी जगु चव्हाण युवराज गायकवाड अमोल भोसले बाळा गायकवाड अजय जाधव प्रशांत भोंडवे अंकुश मडखांबे विशाल बाबरे उमेश वाघमारे अजय जाधव मच्छिंद्र बचुटे सचिन चव्हाण डॉक्टर शिवकुमार चलवादी ईश्वर मोहिते विकास सरवदे अजमल शेख आदींसह कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related posts

शालेय अभ्यासक्रमात संस्कार विषय सक्तीचा करावा- दिपकराव खराडे-पाटील

yugarambh

तांबवे जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक वह्या वाटप

yugarambh

अकलूज शहर बुरूड समाज व युवा मंच,अकलूज यांच्याकडून तिरंगा रॅलीचे आयोजन

yugarambh

गृहविज्ञान महिला महाविद्यालयात वृक्षारोपणासाठी रोपांच्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न

yugarambh

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिना निमित्त गणेश नगर अकलूज येथे पाणीपुरी फ्री 

yugarambh

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे- बाळदादा

yugarambh

Leave a Comment