December 8, 2023
yugarambh
Breaking News
राजकीय

राज्यसभेच्या मतांचे अचूक गणित… मविआ चे काय चुकले?

युगारंभ -महाराष्ट्र राज्यात झालेल्या राज्य सभेच्या निवडणूकीचा हा निकाल असा कसा काय लागला हे भल्या भल्या नां समजलेले नाही. त्याचे कारण 288सदस्य संख्या असणाऱ्या महाराष्ट्र विधान सभेमध्ये म.वि.आ.कडे 170 सदस्यांचे संख्या बळ होते. तर bjp कडे फक्त 106.तरी सुद्धा 106वाल्यांना 6पैकी3जागा मिळाल्या आणि 170 वाल्या नां पण तीनच.

हा चमत्कार कसा घडला?हे केवळ अंक गणिताचा अभ्यास करण्यात प्रवीण असलेल्या लोकांना समजणे शक्य नाही. तर त्यासाठी राज्य शास्त्राचा (political science )चा अभ्यास असावा लागतो. त्यासाठी हि निवडणूक कशी लढवली जाते याची बेसिक माहिती असणे जरुरी असते. ती बहुतेकांना नसते. त्यामुळे ते निवडणूक आयोगावर बेफाम आणी चुकीचे आरोप करतात. कदाचित वयैक्तिक हे तुम्हाला माहिती पण असेल. पण सर्वाना हे माहिती असेलच असे नसते.

  •   राज्य सभा निवडणुकीत राज्याच्या विधानसभेचे आमदार हेच फक्त मतदार असतात.
  • या निवडणुकीची प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धतीने होत नाही.
  • तर अपक्ष सोडून सर्व राजकीय पक्षाच्या आमदारांना मत पत्रिकेवर असणाऱ्या नावासमोर आपली पहिली व दुसरी पसंत नोंदवून ते मत पक्षाने अधिक्रुत केलेल्या निरीक्षकाला दाखवायचे असते.
  • पण ते फक्त एकाच अधिक्रुत व्यक्ती ला दाखवायचे असते.
  • सर्वाना नाही. नाही तर ते मत अवैध ठरते.
आता महाराष्टात काय झाले ते पाहू.
  • एकूण विधानसभा सदस्य संख्या .288
  • मयत सदस्य 1
  • अपात्र 2(नबाब मलिक व अनिल देशमुख)= 3
  • एकूण पात्र 285
  • पैकी शिवसेनेचे सुहास कांदे
    यांनी मतपत्रिका दोघांना दाखवली म्हणून ते मत अवैध ठरले.
  • एकूण वैध मते…. एकूण284
आता निवडणूक लढवणारे उमेदवार सहा होते. तर निवडून येण्यासाठी ही पद्धत अवलंबली जाते.
वैधमते गुणिले शंभर भागिले एकूण उमेदवार अधिक एक. जे उत्तर येईल त्यात एक अधिक.

म्हणजे
284×100= 28400 भागिले 7=4057+1=4058 म्हणजे एकूण 4058हीसंख्या निवडून येण्यासाठी आवश्यक आहे.

आता या निवडणुकीत काय झाले ते पाहू.
एकूण 284 आमदारांनी आपली पहिल्या पसंतीची मते अशा रितीने दिली.

BJP एकूण मते होती 106.

  • ती त्यानी आपल्या तीन उमेदवारांना अशी वाटून दिली.
  • पियुष गोयल 48
  • अनिल बोंडे 48
  • मुन्ना महाडिक10
  • याशिवाय वेगवेगळ्या अपक्ष व छोट्या पक्षांकडून 17 मते मॅनेज केली.
अशा रितीने महाडिक याना 27मते मिळाली.अशा रितीने त्यांना106+17अशी एकूण 123 मते मिळाली.
या उलट शिवसेना राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्या कडे हक्काची 152मते होती .
  • त्यांना ओवेसी, समाज वादी पक्ष व इतर अपक्ष मिळून 9मते मिळाली.

एकूण 161मते मिळाली.

म्हणजे123+161=एकूण 284.

आता त्याचे विभजन कसे झाले पाहू.
1) पियुष गोयल 48 ×100= 4800
2)अनिल बोंडे 48×100= 4800
3)महाडिक 27×100 =2700
4)प्रफुल्ल पटेल 43×100= 4300

5)प्रतापगढी 44×100=4400

6)संजय राऊत 41×100=4100
7)संजयपवार 33×100=3300
एकूण 284

आता विजयासाठी आवश्यक मते आहेत 4058.

  • त्यामुळे पहिल्या फेरीतच गोयल,बोंडे, प्रतापगढी,पटेल,आणी संजय राऊत निवडून आले.
  • आणि शेवटच्या जागेसाठी संजय पवार व महाडिक यांच्या मधे दुसऱ्या पसंती ची मते मोजणी साठी स्पर्धा सुरू झाली.
  • आता इथे नियम असा आहे की सर्वात अधिक मते ज्याला मिळाली आहेत त्यांची दुसऱ्या पसंती ची मते मोजली जातात.

  • आणि इथेच bjp ने बाजी मारली. कारण सर्वात जास्त मते गोयल व बोंडे यानी 48मते मिळवली होती.
  • त्यामुळे त्यांची मते पहिल्यांदा मोजली गेली. आता सगळ्यात मोठी हुषारी इथे बीजेपी ने काय केली म्हणजे एकूण मतापैकी सर्वाधिक मते मिळवणारे पहिले दोन उमेदवार बीजेपी चे असतील हे त्यांनी पाहिले.
  • त्यामुळे गोयल यांच्या एकूण 4800मतापैकी निवडून येण्यासाठी आवश्यक ती 4058 मते वजा केली तर अतिरिक्त मते 742होतात
  • ती मते व बोंडे यांची ही अतिरिक्त मते 742 एकूण 1484मते महाडिक यांच्या 2700 मतात मिळवली गेली व महाडिक यांची एकूण मते 4184झाली.
  • जी विजयी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण 4058मतापेक्षा जास्त असल्याने ते आपोआप निवडून आले. आणि त्यांच्या मतांची संख्या4184असल्याने त्यांना राऊत यांच्या पेक्षा ही जास्त मते मिळाली.

जर राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांनी आपल्या उमेदवारांना48पेक्षा जास्त मते दिली असती तर त्यांचीदुसऱ्या पसंती ची मते आधी मोजली गेली असती आणी पवार निवडून आले असते.

तात्पर्य काय तर निव्वळ गणित चांगले असून चालत नाही तर राज्यशास्त्राचा अभ्यास असावा लागतो. जो फडणवीसांचा होता.
मलाही पहिल्यांदा गोयव व बोंडे यांना 96मते वाटून महाडिक यांना फक्त दहा मताचा कोटा का दिला हे समजायला अवघड गेले होते. पण नंतर हा उलगडा झाला. It was a master stroke. याऊलट महाविकास आघाडी ने प्रफुल्ल पटेल यांचा कोटा दोन मतानी वाढवून 44केला तर शिवसेनेने दंगा करुन सर्वाना 42चा कोटा ठरवा असा आघाडी त आग्रह धरला होता.
आपल्या कडे अजूनही लोकांना हे गणित समजत नाही कर्नाटक मधे ही हेच झाले. सितारामन बाईना 46मते द्या यला लावून त्यांची अतिरिक्त मते मिळाल्याने bjp चा तिसरा उमेदवार कर्नाटक मधे निवडून आला.

Related posts

केंद्र सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा भांडापोड करण्यासाठी होऊ द्या चर्चा- राहुल चव्हाण पाटील

yugarambh

अकलूज मधे युवासेनेच्या वतीने गद्दारांची अंत्ययात्रा .

yugarambh

माळीनगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

yugarambh

नमामि चंद्रभागा प्रकल्पांतर्गत निरा नदीचे पुनरुज्जीवन व सुशोभिकरण व्हावे.-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी

yugarambh

मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यात ‘मोदी माफी मागो’ आंदोलन : नाना पटोले

Admin

PM Modi : पंतप्रधान मोदी यांनी मानले शरद पवारांचे आभार, म्हणाले…

Admin

Leave a Comment