अकलूज (युगारंभ )- माळशिरस तालुक्यातील विद्युत विभागांचे कामांना जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ मध्ये निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे आ रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे .
सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली . या बैठकीत आ मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यासह जिल्ह्यातील मागण्यांचे निवेदन पालकमंत्री भरणे यांना दिले .
आ. मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील विद्युत विभागाचे कामांना जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ योजनेअंतर्गत निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली . यामध्ये
- मौजे निमगांव (म) येथील लिक लाईन लोड वेगळा करणेसाठी ११ के.व्ही. शेरी फिडर व निमगांव एजी फिडर ३३/११ केव्ही निमगांव उपकेंद्र करणे
- , मौजे श्रीपूर येथील काळेवस्ती गावठाण डीपी येथे अँडीशनल करणे ,
- मोजे दहिगांव (किरदकवस्ती) येथे नाना शंकर किरदकर यांचे घरगुती कनेक्शन देणे ,
- मौजे मारकडवाडी येथील शहाजी सदाशिव मारकड व शंकर आप्पा मारकड यांना घरगुती कनेक्शन देणे , मौजे मारकडवाडी येथील हरिभाऊ महादेव मारकड, चंद्रबाई दादा मारकड, सुनंदा हनुमत मारकड, अंकुश महादेव मारकड यांना घरगुती कनेक्शन देणे , मौजे माळशिरस (टेळेवस्ती) येथील विष्णू गोविंद टेळे यांना घरगुती कनेक्शन देणे ,
- मौजे खंडाळी गावठाण येथे अँडीशनल डीपी बसविणे ,
- मौजे दत्तनगर येथे अँडीशनल डीपी बसविणे ,
- मौजे डोंबाळवाडी येथे अँडीशनल डीपी बसविणे
- मोरोची येथील पानसकरवस्ती येथे अँडीशनल डीपी बसविणे ,
- मौजे धर्मपुरी येथे अँडीशनल डीपी बसविणे ,
- मौजे कोळेगांव येथे ११ केव्ही लिंक लाईन ११ केव्ही कोळेगांव फिडरला ३३/११ केव्ही कोळेगांव उपकेंद्र करणे ,
- मौजे कुसमोड गारवाड येथे ११ केव्ही लिंक लाईन लोड वेगळा करणेसाठी कुसमोड एजी फिडर ओव्हर लोडेड २४५ Amp करणे ,
- खुडूस/भाकरेवाडी येथे ११ केव्ही लिंक लाईन लोड वेगळा करणेसाठी ,
- मौजे बाभुळगांव येथे लालासाहेब पराडे गावठाण येथे अँडीशनल सिंगल फेज डीपी करणे ,
- मौजे गोरडवाडी गावठाण येथे अँडीशनल डीपी करणे ,
- मौजे गिरवी येथे १ एजी कनेक्शन गोपाळ सखाराम शिंदे गट नं. ३४१/१ देणे ,
- मौजे फोंडशिरस येथे १ घरगुती कनेक्शन धनंजय गोविंद नवडकर G.n. २९०५ देणे ,
- मौजे फोंडशिरस येथील ठोंबरे डीपीला अॅडिशनल डीपी करणे ,
- मौजे इस्लामपूर येथील सुहास शांताराम रणवरे गट नं. ३५९ घरगुती कनेक्शन देणे ,
- मौजे इस्लामपूर येथे पिराळे गावठाण अँडिशनल डीपी करणे ,
- मौजे पिराळे येथे लघुदाब वाहिनीवर श्रीमंत रामचंद्र बुदनवले यांना घरगुती कनेक्शन देणे ,
- मौजे फोंडशिरस येथे ९ घरगुती कनेक्शनसाठी लघुदाब वाहिनी करणे ,
- मौजे नातेपुते येथे १ शेतीपंप कनेक्शन किशोर भारत लोनारी यांना देणे ,
- मौजे पिंपरी येथे सरपंच नं. १ डीपी अॅडिशनल डीपी करणे ,
- मौजे मांडवे येथे १ शेती पंप कनेक्शन व अँडीशनल डीपी करणे,
- मौजे जळभावी येथे नाथा तुकाराम शेंबडे घरगुती कनेक्शन करणे ,
- मौजे पुरंदावडे येथे क्षमता वाढ डीपी Aug ६३ केव्हीए ते १०० केव्हीए पुरंदावडे गावठाण (४८०८५८) मौजे मेडद येथे मेडद गावठाण अँडीशनल डीपी करणे ,
- मौजे संग्रामनगर येथील पद्मावतीनगर येथे एलटी लाईनचे एबी केबल मध्ये बदलणे १०० केव्हीए पद्मावती डीपी करणे ,
- मौजे बागेचीवाडी येथील पाटीलवस्ती एलटी लाईनचे एबी केबल मध्ये बदलणे १०० केव्हीए पाटीलवस्ती डीपी देणे ,
- मौजे कदमवस्ती येथील एलटी लाईनचे एबी केबल मध्ये बदलणे १०० केव्हीए कदमवस्ती डीपी देणे ,
- मौजे झंजेवस्ती येथील डीपी ला रेळेकर डीपी अँडीशनल करणे ,
- मौजे कुसमोड येथील डीपी ला वाघ डीपी अँडीशनल करणे,
- मौजे कोंडबावी येथील एलटी लाईनचे एबी केबल मध्ये बदलणे १०० केव्हीए कोंडबावी डीपी,
- मौजे अकलूज येथील डीपी ला अँडीशनल इंदिरा घरकुल डीपी करणे ,
- मौजे चाकोरे (प्रतापनगर) येथील डीपी ला अँडीशनल देशमुख डीपी करणे ,
- मौजे शिंगोर्णी येथील डीपी ला अँडीशनल पाणी पुरवठा (कोळेकर) डीपी करणे.
- मौजे बचेरी येथील डीपी ला अँडीशनल गाव डीपी करणे. (४७१६६०२) मौजे बचेरी येथील डीपी ला अँडीशनल पाठक डीपी करणे (४७१६७५६) ,
- मौजे फळवणी डीपी ला अँडीशनल सुरवसे डीपी करणे. (४७१६७४५) ,
- मौजे अकलूज येथे क्षमतावाढ डीपी Aug ६३ केव्हीए ते १०० केव्हीए समतानगर डीपी ,
- मौजे अकलूज येथे अँडीशनल डीपी बाजार तळ (फिश मार्केट डीपी) DTC ,
- मौजे पिरळे येथे २ घरगुती कनेक्शन सोमनाथ गुलाब शिंदे व उत्तम गुलाब शिंदे करणे ,
- मौजे अकलूज येथे क्षमतावाढ डीपी Aug ६३ केव्हीए ते १०० केव्हीए अवाड डीपी ,
- मौजे विजयवाडी येथील एलटी लाईनचे एबी केबलमध्ये बदलणे १०० केव्हीए विजयवाडी डीपी
- मौजे गारवाड येथील ५ शेतीपंप कनेक्शन व अँडीशनल डीपी श्री. तानाजी सर्जेराव शिंदे व इतर ४ कनेक्शन ,
- मौजे बागेचीवाडी येथील एलटी लाईनचे एबी केबलमध्ये बदलणे १०० केव्हीए गुरुमाऊली डीपी
- मौजे गारवाड येथे अँडीशनल डीपी मोहिते पाटील नं. १ डीपी (७१६१७१६) ,
- मौजे विजयवाडी (वैदवस्ती) एलटी लाईनचे एबी केबलमध्ये बदलणे १०० केव्हीए वैदवस्ती डीपी आदी बाबत पत्र दिले आहे .